अहमदनगर दि.४ जानेवारी
देवेंद्र फडणवीस आणि महावितरण कर्मचारी यांच्यामध्ये झालेली बैठक अखेर यशस्वी झाली त्यामुळे आता संप मागे घेण्यात आला असून त्याची अधिकृत घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वीज कर्मचारी यांनी केलीय.
महावितरणचं खाजगीकरण होऊ नये यासाठी महावितरणचे कर्मचारी या संपामध्ये सहभागी झालेले होते. जवळपास 72 तासांचा हा संपवता आणि या सगळ्याची दखल घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही महत्वपूर्ण एक बैठक बोलावली होती. यामध्ये 32 वीज कर्मचाऱ्या कर्मचारी संघटनेने सहभागी झाल्या होत्या.
जवळपास 32 संघटना आज या चर्चेमध्ये सहभागी झाल्या यामध्ये तिन्ही कंपन्यातल्या विविध कर्मचाऱ्यांचे कंत्राटी कर्मचाऱ्यांची संघटना देखील उपस्थित होते यामध्ये प्रामुख्याने तीन-चार मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली. राज्य सरकारची भूमिका विषद करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की राज्य सरकारला या वीज कंपन्यांचं कुठलंही खाजगीकरण करायचं नाही या उलट पुढच्या तीन वर्षांमध्ये 50 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक या तीनही कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या असेट्स मध्ये राज्य सरकार स्वतः करणार आहेत्यामुळे आपले असेट कोणाला देण्याचा किंवा अशा प्रकारे त्याची त्याचं खाजगीकरण करण्याचा कुठलाही विचार नाही. अशी भूमिका राज्य सरकारच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी मांडली. त्यामुळे आता वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याची घोषणा केली आहे त्यामुळे हळूहळू सर्व ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत होणारा असून नागरिकांना झालेल्या त्रासाबद्दल वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.