अहमदाबाद दि.२७ मे
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील चार फरार दहशतवाद्यांना दहशतवाद विरोधी पथकाने जेरबंद केले आहे. कुख्यात माफिया डॉन दाऊद इब्राहिमच्या जवळच्या चार फरार दहशतवाद्यांना आणि मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींना दहशतवादविरोधी पथकाने अटक केली आहे. यामध्ये अबू बकर, युसूफ भटका, शोएब बाबा, सय्यद कुरेशी यांचा समावेश आहे. जयपूरमधील दहशतवादी घटनेतील त्यांचा सहभागही समोर आला असून, राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) या प्रकरणाचा तपास करत आहे. दहशतवादविरोधी पथकाच्या अहमदाबादच्या पथकाने या दहशतवाद्यांना पकडले आहे यापूर्वी राष्ट्रीय तपास यंत्रणेने मुंबईतील डझनभर ठिकाणी छापे टाकले होते.
विशेष म्हणजे मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील गुन्हेगार आणि कुख्यात माफिया डॉन दाऊद इब्राहिम हा वॉन्टेड असून त्याच्यावर केंद्र सरकारने वेळोवेळी अनेक प्रकारच्या कायदेशीर नोटिसा बजावल्या आहेत. अटक करण्यात आलेले चार दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या जवळचे असल्याचे सांगण्यात येत आहे, ते अनेक दिवसांपासून दाऊदच्या इशाऱ्यावर देशातील विविध शहरांमध्ये गुन्हेगारी दहशतवादी घटना घडवत आहेत.त्यांचे दहशतवादी संघटनांशी संबंध असण्याचीही शक्यता असून, दहशतवाद विरोधी पथक त्यांची बारकाईने चौकशी करत असून त्यांचे आंतरराष्ट्रीय संबंध आणि दहशतवादी संघटनांशी असलेली त्यांची मिलीभगत याचा शोध घेऊन चौकशी केली जात आहे.