मुंबई दिनांक 17 जानेवारी
राज्यातील २९ महानगर पालिकांचा निकाल लागल्यानंतर आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते म्हणजे महापौर कोण होणार याकडे. महापौरपदासाठी आरक्षण सोडत अद्याप निघाली नाही. ही सोडत कधी निघणार आहे याची माहिती समोर आली आहे.

राज्यातील 29 महापालिकांचे निकाल शुक्रवारी जाहीर झाल्यानंतर महापौर पदासाठी आरक्षण सोडत सोमवारी किंवा मंगळवारी होण्याची शक्यता वर्तवली जात असून जानेवारी अखेरीस महापौर निवडीची प्रक्रिया पूर्ण होईल.
मुंबई, पुणे, नाशिक, अहिल्यानगर,नागपूर आणि कोल्हापूरसह राज्यातील 29 महानगर पालिकांचे निकाल शुक्रवारी जाहीर झाले. आता सर्वांना उत्सुकता लागली आहे म्हणजे महापौर कोण होणार आहे. आरक्षण सोडत निघाल्यानंतरच महापौर पदाचा चेहरा ठरणार आहे. महापौरपदाचे आरक्षण अद्याप जाहीर झाले नाही त्यामुळे नगरसेवकांची उत्सुकता वाढली आहे. पुढील दोन दिवसांत नगर विकास खाते महापौर सोडत काढणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. तर जानेवारी अखेरीस महापौर निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महापौरपदासाठी सोडतून आरक्षण निश्चित केले जाते. सर्वसाधारण पुरुष किंवा महिला, ओबीसी, अनुसूचित जाती व जमाती अशा क्रमाने आरक्षण सोडत काढली जाते. आधी जर सर्वसाधारण गटासाठी महापौरपद असल्यास पुढच्या वेळी म्हणजे आता तो गट वगळून अन्य प्रवर्गाला आरक्षण दिले जाते. जेणेकरून सर्व गटांना सर्वोच्चपद भूषविण्याची संधी मिळेल. आता सर्व 29 महापालिकांचे निकाल लागले आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष महापौर पदाच्या आरक्षणाकडे लागले आहे. ही आरक्षणाची सोडत लवकरच जाहीर केली जाईल. त्यानंतपर राज्यातील सर्व 29 महापालिकांना महापौर मिळेल.





