Homeशहरबातमीची दाखल ...चौपाटी कारंजा चौक महानगरपालिकेने अतिक्रमण धारकांना विकला काय? बातमी प्रसिद्ध...

बातमीची दाखल …चौपाटी कारंजा चौक महानगरपालिकेने अतिक्रमण धारकांना विकला काय? बातमी प्रसिद्ध होताच गुरुवारी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने केली चौपाटीकारंजा चौकात अतिक्रमण धारकांवर कारवाई…

advertisement

अहमदनगर दिनांक 24 नोव्हेंबर

अहमदनगर शहरातील चौपटीकरांजा परिसरात रस्त्यावरच उभ्या असलेल्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांमुळे अनेक वेळा दिवसातून दर दहा मिनिटाला वाहतुकीचा खोळंबा होत असतो बुधवारी ‘चौपाटी कारंजा चौक महानगरपालिकेने अतिक्रमण धारकांना विकला काय? रस्त्यावर अतिक्रमण करून वाहतुकीस अडथळा आणणाऱ्या अतिक्रमणधारकांवर कारवाई कधी ?” ही बातमी काल आवाज महाराष्ट्राने प्रसिद्ध केल्यानंतर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने गुरुवारी सकाळीच या परिसरात असलेल्या अतिक्रमांवर हातोडा टाकला आहे या परिसरात उभ्या असलेल्या खाद्यपदार्थांच्या काही गाड्या अतिक्रमण विभागाने जप्त केल्या आहेत तर अतिक्रमण विभागाची कारवाई सुरू होताच अनेक खाद्यपदार्थ विक्रेते गाडी घेऊन पळून गेले.

नगर शहरातील प्रचंड वाहतुकीचे आणि गर्दीचे ठिकाण म्हणजे चौपटीकरांजा हे असून अहमदनगर शहरातील जुन्या शहरात जाण्यासाठी नागरिक या मार्गाचा वापर करतात नालेगाव,जुने कोर्ट चितळे रोड आणि दिल्लीगेट कडून येणारी वाहतूक या चौकात येऊन थांबते. मात्र या ठिकाणी अतिक्रमण करून उभा असलेल्या खाद्यपदार्थांच्या गाड्या जसे काय महानगरपालिकेची जागा विकत घेतल्यासारख्या लावल्या जातात. या ठिकाणी नाश्त्यासाठी उभा राहणारे ग्राहक रोडवरच गाड्या पार्किंग करून नाश्ता करत असतात. या ठिकाणच्या खाद्यपदार्थांच्या गाड्या हटवाव्यात आणि या रस्त्याचा श्वास मोकळा करावा अशी मागणी वारंवार होत असते

अखेर गुरुवारी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने या परिसरातील खाद्यपदार्थांच्या गाड्यांसह फळविक्रेते आणि भाजी विक्रेते यांचे अतिक्रमण काढले आहेत मात्र ही कारवाई एक दिवसापूर्वी नसावी या कारवाईत सातत्य असावे महानगरपालिकेची अतिक्रमण विभागाची गाडी रोज या रस्त्यावरून फिरवल्यास अतिक्रमण करणाऱ्यांवर थोडा जरब बसेल त्यामुळे ही गाडी या ठिकाणी रोज यावी अशी मागणी आता या परिसरातील नागरिकांनी केली आहे

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular