अहिल्यानगर दिनांक 19 ऑक्टोबर
बहुचर्चित लॉटरी विक्रेता अशोक लांडे खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेले माजी महापौर संदीप कोतकर यांची जिल्हा बंदी मुंबई उच्च न्यायालयाने उठवली आहे.
संदीप कोतकर यांनी निवडणुकीचे कारण देऊन जिल्हा बंदी उठवण्याबाबत अर्ज केला होता यावर सुनावणी होऊन मुंबई उच्च न्यायालयाने 20 ऑक्टोबर ते एक डिसेंबर पर्यंत माझी महापौर संदीप खोतकर यांची जिल्हा बंदी स्थगित केली आहे.
अहिल्यानगर मध्ये प्रवेश केल्यानंतर संदीप कोतकर यांना दर सोमवार अहमदनगर शहरातील कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये जाऊन सकाळी आठ ते दहा या दरम्यान हजेरी द्यायची आहे.
2016 मध्ये लॉटरी विक्रेता अशोक लांडे यांच्या खून प्रकरणी माजी महापौर संदीप कोतकर यांच्यासह त्यांचे मन दोन बंधू आणि त्यांचे वडील यांना जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. या शिष्यविरोधा त त्यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले असून उच्च न्यायालयाने या शिक्षेला स्थगिती दिलेले आहे त्यानंतर माजी महापौर संदीप कोतकर यांच्यासह त्यांचे बंधू आणि वडील जामीन घेऊन बाहेर आलेले आहेत.
मात्र या अपिलावर अंतिम आदेश होईपर्यंत त्यांना
जिल्हाबंदीची आलेली होती सचिन कोतकर यांनी
अर्ज केल्यानंतर त्यांची जिल्हाबंदी यापूर्वीच उठविण्यात आलेली आहे. संदीप कोतकर यांनीही जिल्हाबंदीची अट उठविण्यासाठी अर्ज दाखल
केला होता.
तसेच महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीचा निकालानंतर केडगाव मध्ये दोन शिवसैनिकांची हत्या झाली होती यावेळेसही माजी महापौर संदीप कोतकर यांच्यावर आरोप करण्यात आले होते. त्यावेळी संदीप कोतकर हे बंदीवासात होते मात्र दातावर उपचार करण्यासाठी ज्या दिवशी शिवसैनिकांचा खून झाला त्याच दिवशी ते उपचार घेण्याकरता जळगाव येथे जात असताना त्यांचे आणि अहमदनगर मधील काही लोकांचे मोबाईल वरून संभाषण झाल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता याबाबत आता न्यायालयात सुनावणी सुरू आहे.