अहिल्यानगर दिनांक 18 जून
नगर शहरातील सावेडी उपनगरातील एकवीरा चौकात झालेल्या बहुचर्चित अंकुश चत्तर हत्या प्रकरणातील आरोपी सध्या जेलची हवा खात असून हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ आहे.
15 जुलै 2023 मध्ये अंकुश चत्तर याचा खून करण्यात आला होता या प्रकरणी भाजप नगरसेवक स्वप्नील रोहिदास शिंदे, अक्षय प्रल्हादराव हाके, अभिजीत रमेश बुलाख , महेश नारायण कुर्हे, सूरज ऊर्फ विकी राजन कांबळे या पाच जणांसह अजून तीन जण सध्या नाशिक येथील कारागृहात आहेत. त्यांचे जामीन करण्याचे प्रयत्न सुरू असून या जामीन प्रकरणात अंकुश चक्कर यांचे कुटुंबिया अडथळा आणत असल्याचा आरोप करत दुचाकीवर आलेल्या अज्ञात लोकांनी अंकुश चत्तर यांच्या आई व पत्नीस पाईपलाईन रोडवरील यशोदा नगर येथील भाजी बाजार समोर तुम्ही जामीनासाठी का नडता, तुमचा आणखी एखादा मारायचा आहे का अशी धमकी देऊन निघून गेले. याप्रकरणी आता तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये आईच्या तक्रारीवरून अज्ञात धमकी देणाऱ्या लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.