अहिल्यानगर दिनांक 12 फेब्रुवारी
नगर शहरात बुधवारी रात्री अकरा वाजेच्या दरम्यान राज चेंबर परिसरात अबरार मुक्तार शेख या चोवीस वर्षीय तरुणावर गोळीबार करण्यात आला असून यात अबरार मुक्तार शेख याच्या कमरेला एक गोळी लागली असल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नगर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी आत तोफखाना पोलिस ठाण्यात सय्यद जैद रशीद उर्फ टैप्या, जाबीर सादीक सय्यद उर्फ जाबु, अफजल आसीर शेख,अस्लम असीर शेख, अल्ताफ शेख, यांच्या विरोधात संगणमताने कट कारस्थान रचून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अबरार मुक्तार शेख याने तीन जानेवारी रोजी भिंगार पोलिस ठाण्यात अफजल आसीर शेख व अस्लम आसीर शेख यांचेविरोधात मारहाणीचा आणि बंदूक दाखवून जीवे मारण्याचा प्रयत्न करणे या कलमाखाली गुन्हा दाखल केला होता.याच कारणावरून आठ फेब्रुवारीला सय्यद जैद रशीद उर्फ टैप्या याने अबरार शेख यास गोविंदपुरा परिसरात अडविले होते त्यावेळी त्याने अबरार यास धमकी दिली होती तुने अफजल शेख और अस्लम शेख के खिलाफ जो केस दाखिल किया है, वो वापिस ले, मै तेरोको दो लाख रुपये देता हु, अगर तुने केस वापस नही लिया, तो मैं तेरेको देख लूंगा…या घटने नंतर अबरार शेख हा प्रचंड घाबरून होता. बुधवारी रात्री अबरार शेख हा आपल्या भावाच्या माळीवाडा स्टँड परिसरात असणाऱ्या ट्रॅव्हलच्या दुकानातून रात्री 11:00 च्या सुमारास घरी जाण्यासाठी मित्र सोबत निघाला होता. त्यावेळी कुठला स्टॅन्ड परिसरातील राज चेंबर परिसरात ते आले असताना मागून एक ऑटोरिक्षा भर द्यावा वेगात आली आणि अबरार शेख यांच्या दुचाकीला आडवी लावून गाडी थांबवली यावेळी अबरार याने रिक्षात पाहिले असता जाबीर उर्फ जाबु सादीक सय्यद, हा रिक्षा चालवित होता तर रिक्षात पाठीमागे सय्यद जैद रशीद उर्फ टैप्या हा त्याचे हातात गावठी कट्टा घेवुन उतरताना दिसला. ते पाहून अबरार शेख याने दुचाकीवरून उतरून राज चेंबर कडे पळ काढला त्यावेळी मागून आलेल्या सय्यद जैद रशीद उर्फ टैप्या याने बंदूकतून अबरार शेख याच्यावर गोळी चालवली ती गोळी अबरार शेख याच्या कमरेखाली लागली मात्र जीवाच्या भीतीने अबरार शेख पळत राहिला तर टैप्या हा त्यावेळी शिवीगाळ करत ओरडत होता अफजल शेख और अस्लम शेखके ऊपर केस कर रहा है क्या? तेरोको जानसे मार डालता, ही सर्व धावपळ पाहून त्या ठिकाणी नागरिक दुकानात बाहेर आल्यामुळे गर्दी पाहून सय्यद जैद रशीद उर्फ टैप्या हा पळून गेला. त्यानंतर अबरार शेख याला सुरुवातीला जिल्हा रुग्णालयात आणि त्यानंतर खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
याप्रकरणी आता तोफखान पोलीस स्टेशनमध्ये अबरार शेख याच्या फिर्यादी वरून सय्यद जैद रशीद उर्फ टैप्या, २) जाबीर सादीक सय्यद उर्फ जाबु ३) अफजल आसीर शेख, ४) अस्लम असीर शेख, ५) अल्ताफ शेख, सर्व रा. मुकुंदनगर, ता. जि. अहिल्यानगर यांच्या विरोधात (बी एन एस), 2023 109, (बी एन एस), 2023 126(2) (बी एन एस), 2023 3(5), (बी एन एस), 2023 61(2), (बी एन एस), 2023 352, (बी एन एस), 2023 351 7 शस्त्र अधिनियम, १९५९ 3 8 शस्त्र अधिनियम, १९५९ 7 9 शस्त्र अधिनियम, १९५९ 25 10 शस्त्र अधिनियम, १९५९ 27 3. (a) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तोफखाना पोलीस करत आहेत.





