Homeजिल्हाकोटीच्या कोटी रुपये देणगी मिळवणाऱ्या साई बाबांच्या दर्शनाला जाताना भाविकांना खडतर रस्त्याने...

कोटीच्या कोटी रुपये देणगी मिळवणाऱ्या साई बाबांच्या दर्शनाला जाताना भाविकांना खडतर रस्त्याने करावा लागतोय प्रवास नगर-शिर्डी-शिंगणापूर रस्ता दुरुस्ती करावा पद्मश्री पोपटराव पवारांचे नितीन गडकरींना पत्र

advertisement

अहमदनगर दि १९ जुलै
पद्मश्री पोपटराव पवार यांनी अहमदनगर शिर्डी-शिंगणापूररस्ता कामासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरीयांना पत्र दिले आहे.नुकतीच दिनांक 14 जुलै रोजी नवी दिल्ली येथे गडकरी यांच्याशी बोलून त्यांचेकार्यालयीन अधीक्षक अमोल बिराजदार व खासगी सचिव अमोल भोंडवे यांच्याद्वारेपरिवहन भवन नवी दिल्ली यांच्याकडे पत्र देण्यात आले व अहमदनगर-शिर्डी -शनीशिंगणापूर या रस्त्याकडे स्वत: लक्ष देण्याची विनंती केली आहे. देशभरातून दररोजशिर्डी व शनि शिंगणापूरला येणारे भाविक आदर्शगाव राळेगणसिद्धी व हिवरे बाजारमधीललोकसहभागातून झालेला विकास पाहण्यासाठी येतात. काहीजण राहुरी कृषीविद्यापीठालाही भेट देतात. नगर जिल्ह्यातील कृषि आणि सहकाराची कामेपाहण्यासाठी देशभरातून पर्यटक येतात. दरवर्षी साईबाबांच्या तिजोरीत हजारकोटी रुपये जमा होतात, परंतु येणार्‍या पर्यटकांचे नेहमीच म्हणणे असते कीशिर्डी-राहुरी-शनी शिंगणापूर-नगर रस्ता का चांगला होत नाही? त्यामुळे आपण यास्त्याकडे स्वत: लक्ष देऊन अंदाजपत्रकीय दराने ठेकेदाराची नेमणूक करूनदर्जेदार काम केल्यास जेणेकरून कित्येक वर्षापासून रस्त्याची असलेली दुरवस्था दूरहोईल, असा विश्‍वास पवारांनी गडकरींना पाठवलेल्या या पत्रात व्यक्त केला आहे.

मागील 15 वर्षांपासून नगर-राहुरी-शनी शिंगणापूर-शिर्डी यारस्त्याची दुरवस्था आहे. या रस्त्याचे टेंडर निविदा दरापेक्षा कमी दराने भरलेजाते व त्यामुळे या कमी दरास शासनाची मान्यता मिळते. पण त्यामुळे या रस्त्याचे कामदर्जेदार होत नाही व रस्त्याची पुन्हा पुन्हा दुरवस्था होते. त्यामुळे या रस्त्याच्याकामासाठीची कमी दराची निविदा न स्वीकारता अंदाजपत्रकीय दरानुसारच निविदास्वीकारावी व या रस्त्याचे काम कायमस्वरुपी दर्जेदार करून या रस्त्याची दुरवस्था कायमचीसंपवावी, अशीही मागणी पवारांनी गडकरींकडे केली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular