Homeराजकारणनगर शहरातील राजकारणातील सर्वात धक्कादायक बातमी...

नगर शहरातील राजकारणातील सर्वात धक्कादायक बातमी…

advertisement

अहिल्यानगर दिनांक 12 ऑक्टोबर

अहिल्यानगर मधील राजकारणातील सर्वात धक्कादायक माहिती आता समोर आली असून आघाडी मधील एका पक्षात अहमदनगर शहरातील एक मातब्बर नेत्याचा त्याचबरोबर राजकीय महिलेचा प्रवेश करणारा असून हा प्रवेश पुण्यात कोजागिरीच्या मुहूर्तावर होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी मधील सर्वच पक्षाशी चर्चा करून हा प्रवेश करून घेणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून समजली आहे यामध्ये महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातील एका जागेची आदलाबदलही होऊ शकते.

आघाडी कडून विधानसभेसाठी सक्षम अशा उमेदवारांची चाचपणी सुरू असून या चाचणीमध्ये तो नेता राजकारणात लागणाऱ्या सर्व गुणांमध्ये उत्तमपणे बसू शकतो त्यामुळे त्याचा प्रवेश निश्चित असल्याचं समजते आहे.

मात्र या प्रवेशामुळे स्थानिक राजकारणामध्ये मोठी खळबळ होणार असून हा प्रवेश म्हणजे नगर शहरातील राजकीय नेत्यांना मोठा धक्का असणार आहे. अनेक वर्षांपासून राजकारणापासून दूर असलेली ती महिला नेता आणि युवा नेता आता आता थेट नगरच्या राजकारणात प्रवेश करणार आहे. आगामी विधानसभा लक्षात घेता हा प्रवेश म्हणजे एक मोठी वेगळी रणनीती आखून प्रवेश दिला जात आहे.त्यामुळे स्थानिक राजकारणी मात्र चांगलेच गोंधळात पडतील अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

राजकारणाची परिस्थिती आता पूर्वीसारखी राहिलेली नसून निष्ठा पक्षासाठी केलेले काम आणि पक्षासाठी दिलेले योगदान बलिदान काही क्षणात विसरून जाण्याची परंपरा आता सुरू झाली आहे आणि त्यात महाराष्ट्रामध्ये दांड्याचे झेंडे कधी बदलतील हे कळतच नाही. त्यामुळे आता जर तो राजकीय प्रवेश झाला तर नेहमीप्रमाणे नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी फक्त झेंडे घेऊन फिरायचे आणि दुसऱ्याच्या नावाने प्रचार करायचा अशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

तसेच सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट चांगलीच वायरल होत आहे कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्या याचलयाच्या व्यासपीठावरील नेते कोण कुठे आणि कोणत्या खुर्चीवर बसेल हे त्याला माहीत नसते. रात्री झोपताना नेता एका ठिकाणी असतो तो सकाळी उठल्यावर दुसऱ्या ठिकाणी गेलेला असतो मात्र कार्यकर्ता फक्त झेंडे आणि सतरंज्याच उचलतो.

सध्या आघाडी कडून अनेक जण आमदारकीसाठी इच्छुक असून अनेक जणांनी आगामी निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. मतदारांच्या गाठीभेसह विविध उपक्रम सध्या भावी आमदार करत असून जर त्या नेत्याचा प्रवेश आणि त्याला विधानसभेसाठी शब्द दिला गेला तर नगर शहरात अनेक दिवसांपासून तयारी करत असलेल्या नेत्यांच्या तयारीवर पाणी फिरणार हे नक्की…

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular