अहमदनगर दि.३ मे
नगर अर्बन बँक बचाव संघर्ष समितीच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालया समोर एकदिवशीय उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनाविषयी पंधरा दिवसांपूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षकांना समक्ष भेटून नगर अर्बन बँक बचाव समितीच्या सदस्यांनी उपोषण करण्याबाबतचे पत्र दिले होते मात्र आज जेव्हा उपोषण सुरू करण्याची वेळ आली तेव्हा उपोषणासाठी टाकण्यात आलेला मंडप पोलिसांनी काढून घेण्यास सांगितला त्यामुळे कडक उन्हात ठेवीदारांना उपोषण सुरू करावे लागले आहे.
अशा आहेत ठेवीदारांच्या मागण्या-
नगर अर्बन बँकचे सर्व दाखल गुन्ह्यामध्ये पोलीस खात्याने ठेवीदारांचे एम. पी. आर. डि. थे कायद्याचे १२० व कलम लावलेच पाहिजे. या कायद्यान्वे बँक संधर्भात कोणत्याही आरोपीना जामीन मंजूर करू नये.
नगर अर्बन बँक घोटाळ्याचा फॉरेंसिक ऑडीट नगर अर्बन बँक बचाव समितीच्या हाती आला असून या
ऑडीट धक्कादायक भानगडी बाहेर येत आहेत. टक्केवारी देणारे कर्जदाराला नियमबाह्य कर्ज दिलेच पण थकबाकी भरायला पण बँकेचच पैसे थकबाकी बँकेच्या पैशाने भरून परत वरती ५ लाख ६ लाख रिबेट पण दिला व या रिबेट चे पूढे कंसात लिहले जायचे ( चेअरमन साहेबांच आदेशावरून)
म्हणजे बँक रिजर्व बँकचे कायद्यावर चालविली जात नव्हती, तर चेअरमनचे आदेशावर चालत होती. या बेकायदेशीर कामकाजा विरुद्ध कोणीच आवाज उठवला नाही हे विशेष
रिजर्व बँकने २०१५ पासून प्रत्येक वर्षी सुधरणेची ताकीद देताना अनेक संधी दिल्या रिजर्व बँकचे ही ताकीद पत्रे संचालक मंडळ सभांमध्ये चर्चेला ठेवली गेली व नोंद घेतली. पुढील वर्षी सुधारणा करू असे थातूर मातूर उत्तर दरवर्षी दिले जात होते. परंतु सुधारणा एकदाही केली नाही बनावट सोनेतारणाचे अनुभवातून दोन लाखाचे पुढचे सोने तारण
करताना त्या कर्जाला मासिक हमेचे बंधन घातले जाईल असे २०१५ मध्ये लिहून दिले होते. परंतु हा नियम फक्त कागदावरच राहीला शेवगाव बनावट सोनेतारण २०१८ मध्ये पोलखोल झाली. जर २०१५ मध्ये केलेला नियम पाळला असता तर हा ५ कोटी ३० लाखाचा पोटाळा झालाच नसता.
फॉरेन्सिक ऑडिटमध्ये सर्वकाही माहिती समोर आली असून या प्रकरणात असलेले आरोपी अजूनही फरार आहेत. जे आरोपी अटकेत आहेत त्यांनी जामीन मिळावा यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. मात्र ज्या ठेवीदारांचे कष्टाने कमावलेल्या ठेवी बँकेत अडकून पडल्या आहेत त्या ठेवीदारांना भर उन्हात उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे.
जीवनभर कष्ट करून जमा केलेली पुंजी बँकेच्या संचालकांनी आणि कर्जदारांनी सामूहिक रित्या लुटली आहे यामध्ये अनेक कर्ज ज्यांची ऐपत दहा रुपये भरायचे नाही असे कर्जदार रूपायांचे कर्ज घेऊन पैसे गीळून बसले आहेत आणि सर्वसामान्य ठेवीदार उन्हात उपोषणाला बसले आहेत.