Homeविशेषनगर शहर : नगर शहरात नायलॉन मांजा पोहचला विक्रेत्यांवर कारवाई कधी...

नगर शहर : नगर शहरात नायलॉन मांजा पोहचला विक्रेत्यांवर कारवाई कधी ? एखाद्याचा जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार का ?

advertisement

अ.नगर दिं.१० डिसेंबर

अवघ्या महिन्यावर आलेल्या संक्रांत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांज्यावर सरकारने बंदी असतानाही बंदी झुगारून नगर शहरातील काही विक्रेते नायलॉन मांजाची विक्री चोरीछुपे पद्धतीने करत आहेत. दरवर्षी संक्रांत जवळ आल्यानंतर महानगरपालिका या चायना मांजा विक्रीला बंदी घालण्यासाठी एक पथक स्थापन करते मात्र विशेष म्हणजे या पथकाला नायलॉन मांजा कधी सापडत नाही मात्र नगर शहरात सर्रासपणे खुल्या नायलॉन मांजा विकला जातो.

नगर शहरात सध्या मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजा आला असून काही ठराविक विक्रेते हा मांजा विक्रीसाठी मागून घेतात एकाच वेळेस हजारो बंडल (गट्टू ) नगर शहरात विक्रीसाठी येत असून दरवर्षी या नायलॉन मांजामुळे अनेक जण गंभीर जखमी होतात. तर अनेकजण या नायलॉन मांजामुळे कायमचे जायबंदी झालेले आहेत. तर हजारो पशुपक्षींचा यांना माझ्यामुळे दरवर्षी जीव जातो न्यायालयाने बंदी घातल्यानंतरही हा मांजा बनतो कसा आणि विक्रीसाठी येतो कसा हाच मोठा प्रश्न असून हा जीवघेणा मांजा अत्यंत घातक असूनही थोड्या पैशांसाठी विक्रेतेही आपली लाज सोडून हा नायलॉन मांजा विकून पैसे कमवतात.

जर याच विक्रेत्यांच्या घरातील एखादी व्यक्ती या नायलॉन मांज्यामुळे दगावली तर थोड्या पैशासाठी हे त्यावरही पांघरून टाकतील का ? असा संतप्त सवाल आता नागरिक करू लागले आहेत. चोरीछुपे नायलॉन मांजा विकणाऱ्या अशा लोकांवर हद्दपारीची कारवाई करावी अशी मागणी नागरिक करू लागले आहेत. नाशिकमध्ये आणि पुण्यामध्ये मागील वर्षी नायलॉन मांजा विक्रेत्यांवर हद्दपारीची कारवाई पोलिसांनी केली होती त्याचप्रमाणे नगर शहरातही अशी कारवाई करावी अशी मागणी आता समोर येत आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular