अहिल्यानगर दिनांक २२ डिसेंबर
बंदी असलेल्या नायलॉन मांजाच्या गोडवून वर छापा टाकून स्थानिक गुन्हे शाखेने जवळपास एक लाख वीस हजार रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त केला आहे.
नगर शहरातील रेल्वे स्टेशन कडे जाणाऱ्या लोखंडी पुलाजवळ काही पत्रांचे शेड आहेत त्या ठिकाणी चोरीछुपे नायलॉन मांजाची विक्री चालू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळाली होती त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी संदीप पवार, विश्वास बेरड, पंकज व्यवहारे, संदीप दरंदले, रविंद्र घुंगासे, उमाकांत गावडे यांनी त्या ठिकाणी जाऊन चोरीछुपे नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दर्शन दिनेश परदेशी या तरुणास ताब्यात घेतले आणि त्याच्या दुकानाची झडती घेतली असता त्या ठिकाणी एक लाख वीस हजार रुपयांचे नायलॉन मांजाचे 240 बंडल आढळून आले असून पोलिसांनी ते जप्त केले आहेत.
दर्शन दिनेश परदेशी यांच्या विरुध्द रविंद्र तुकाराम घुंगासे यांच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस ठाणे बी. एन. एस. २२३, १२५ सह पर्यावरण संरक्षण
अधि. १९८६ चे कलम ५, १५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी मांजा विक्रेत्यांना शासनाने बंदी घातलेला बेकायदेशीर नायलॉन मांजा विक्री व साठवणुक करु नये असे आवाहन केले आहे. बंदी असलेला मांजा विक्री करताना आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला असून त्याचप्रमाणे नागरिकांनी देखील नायलॉन मांजा खरेदी करू नये असे आवाहन केलेले आहे.