नाशिक दि.१६ ऑगस्ट
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात असताना याच पार्श्वभूमीवर पोलीस दलातील पोलीस नाईक अश्विनी देवरे यांनी पोलीस दलासह नाशिकचे नाव सातासमुद्रापार नेले आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील पहिल्या आर्यनमॅन वुमन होण्याचा रेकॉर्ड त्यांनी केला आहे.
स्पर्धा जिंकल्यानंतर अश्विनी देवरे याना विशेष मेडलने गौरविण्यात आले. देवरे या पोलीस दलात 2019 भरती झाल्या असून सध्या जिल्हा बदली झाल्याने नाशिक रोड पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावत आहेत.
पोलीस खात्यातील कर्तव्य आणि संसारांचा गाडा उत्तमरीत्या हाकत त्यांनी अनेक स्पर्धा काबीज केल्या आहेत. श्रीलंका, मलेशिया तसेच भारतातील अनेक मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होऊन त्यांनी उत्तुंग कामगिरी केली आहे. आत्तापर्यंत त्यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये 40 सुवर्ण 21 रोग 28 पदके पटकावले आहे आता आयर्न मॅन स्पर्धेत त्यांनी बाजी मारून महाराष्ट्र पोलीस खात्याच्या इतिहासात सुवर्ण नोंद केली आहे.