अहमदनगर दिनांक १ मे
अहमदनगर शहरातील नैसर्गिक ओढे नाले (natural covered drains) बुजवून त्यावर टोलेजंग इमारती(bilding ) बांधल्या गेल्या आहेत. याबाबत ज्येष्ठ माहिती अधिकारी कार्यकर्ते शशिकांत चेंगेडे यांनी सरकार दरबारी आवाज उठवला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते या विरोधात लढाई करत आहेत. मात्र शासन दरबारी होणारी दिरंगाई आणि चाल ढकल यामुळे दरवर्षी अनेक घरांमध्ये दुकानांमध्ये पावसाळ्यात पाणी जात असते अनेकांचे संसार या पाण्यामुळे वाहून जातात मात्र आंधळे आणि बहिरे असलेले प्रशासन याबाबत काहीच हालचाल करताना दिसत नाही.
अहमदनगर महानगरपालिकेने सर्वेक्षण करून नैसर्गिक ओढे नाले बुजवले असल्याचे मान्य केले आहे . मात्र आता या नैसर्गिक ओढ्या नाल्यांवर बांधलेले बांधकाम उतरवण्यासाठी महानगरपालिका कोणतीच कारवाई करताना दिसत नाही. नैसर्गिक ओढे नाले प्रकरण गाजत असतानाच नव्याने गुलमोहर रोडवर असलेल्या एका मोकळ्या प्लॉटला बांधकाम करण्यासाठी नगररचना विभागाने परवानगी दिली आहे. विशेष म्हणजे या प्लॉट मधून जाणारा नैसर्गिक ओढा हा सिमेंटचे पाईप टाकून बुजवण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मागील घरांमध्ये पाणी घुसण्याचा मोठा धोका निर्माण झाला असून ही बाब लक्षात येताच नरहरी नगर मधील ज्येष्ठ वयोवृद्ध नागरिकांनी ही बाब महानगरपालिका अतिक्रमण विभाग आणि नगररचना विभागाच्या निदर्शनास आणून दिली. पावसाळा तोंडावर आला आहे जर या ठिकाणी नैसर्गिक ओढा बुजवला तर संपूर्ण नरहरी नगर पाण्याखाली जाऊ शकते ही बाब वयोवृद्ध नागरिकांनी लक्षात आणून देऊनहीं महानगरपालिकेचा नगररचना विभाग आणि अतिक्रमण विभाग कोणतीच कारवाई करण्यासाठी पुढे आलेला नाही. उन्हातान्हामध्ये ज्येष्ठ नागरिक ही समस्या घेऊन महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना भेटून नैसर्गिक ओढ्यात टाकलेले सिमेंटचे पाईप काढून घ्यावेत अशी मागणी करत असताना अतिक्रमण विभाग हा झोपेचे सोंग घेऊन बसलेला आहे.
पावसाळा तोंडावर आल्यामुळे या नैसर्गिक ओढ्यामध्ये टाकलेले सिमेंटचे पाईप काढून टाकावेत अन्यथा महानगरपालिके समोर या वयात उपोषण करावे लागेल अशी पाळी येऊन देऊ नका अशी विनंती नरहरी नगर मधील ज्येष्ठ वयोवृत्त नागरिकांनी महानगरपालिकेकडे केली आहे.