Home शहर नायलॉन मांजा विक्री होताना दिसला की लगेच करा पोलिसांना फोन… नायलॉन...

नायलॉन मांजा विक्री होताना दिसला की लगेच करा पोलिसांना फोन… नायलॉन मांजा विक्री कारवाईसाठी सर्व पोलिस ठाण्यात स्वतंत्र पथके

अहिल्या नगर दिनांक 25 डिसेंबर

बंदी असलेला नायलॉन मांजाची वाहतुक, साठवणुक,
विक्रीवर कारवाईसाठी जिल्हा पोलीस दल सरसावले आहे. सर्व पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेमार्फत नायलॉन मांजा विक्री व वापरास प्रतिबंध करण्याकरीता पथकांची स्थापना करण्यात आली आहे. तसेच जनतेकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन कायदेशीर कारवाई करण्यासाठी जिल्हास्तरावर पोलीस नियंत्रण कक्ष येथे कारवाईचा आढावा घेण्याकरिता पोलीस अंमलदार नियुक्त केलेले आहेत.

मकरसंक्राती सणाच्या निमित्ताने पतंगबाजीमध्ये (kite)
वापरण्यात येणार्या नायलॉन (naylon )मांजाचा वापर होत असल्याने मनुष्य, पक्षी, प्राण्यांची जिवीत हानी, जखमी झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. यामुळे पोलीस दलाने मोहिम हाती घेतली आहे.

जिल्हा पोलीस प्रशासनाच्यावतीने नायलॉन मांजाबाबत तक्रार / माहिती देण्याकरीता नागरिकांनी
डायल ११२ या क्रमांक किंवा पोलीस नियंत्रण कक्ष ०२१४ – २४१६१३२, स्थानिक गुन्हे शाखा ०२४१- २४१६१११ या ठिकाणी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. नायलॉन मांजाबाबत
माहिती देणाऱ्या नागरिकांचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे. बेकायदेशीर नायलॉन मांजा विक्री, वाहतूक व साठवणूक यांचेबाबत नागरिकांनी माहिती
द्यावी, असे आवाहन अधीक्षक ओला यांनी केले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version