अहिल्यानगर दिनांक 1 नोहेंबर
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या वतीने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. नगर शहरातील महापालिकेच्या 17 प्रभागांसाठी रविवारी इच्छुक उमेदवारांसाठी एक बैठक आयोजित करण्यात आली असून रविवारी सकाळी अकरा वाजता नगर छत्रपती संभाजी नगर महामार्गावरील
शासकीय विश्राम गृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

बैठकीसाठी येणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी पक्षाने दिलेला फॉर्म भरून स्वतः मिटिंगला उपस्थित रहावे. असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
५ नोव्हेंबरला नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका जाहीर होणार आहेत. तर १५ डिसेंबरला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी मतदान होईल परिषदेच्या निवडणुका सुरू असतानाच महानगरपालिका निवडणुका जाहीर होऊन १५ जानेवारीला मतदान पार पडेल, आणि ३१ जानेवारीपर्यंत सर्व निवडणुका पूर्ण होतील आस अंदाज वर्तवण्यात येत आहे.




