अहिल्यानगर दिनांक २१ डिसेंबर
अहिल्यानगर महानगर पालिका निवडणूक जवळ येऊ लागला तसे आता पक्षांतर होऊ लागले असून बोल्हेगाव येथील उद्योजक आणि शिवसेना पक्षाचे बाबासाहेब उर्फ बाबू शेठ नागरगोजे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत हजारो कार्यकर्त्यांसह हा प्रवेश सोहळा पार पडला.

तर आता भाजपा मधून काही प्रवेश राष्ट्रवादीत प्रवेश होणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटा मध्ये जोरदार इन्कमिंग सुरू असून आधीच राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये अनेक इच्छुक असून त्यांच्याकडे सुरू असलेली इनकमिंग ही इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढवणारी आहे.





