अहमदनगर दि.१४ ऑक्टोबर-
चाँद सुलताना हायस्कूलच्या विश्वस्त आणि नवीन चेअरमन व्हाईस चेअरमन यांचा वाद आता चांगलाच पेटला असून शुक्रवारी धर्मदाय आयुक्तांच्या आदेशानुसार झालेल्या चेंज रिपोर्ट मधील सर्व नवनिर्वाचित विश्वस्त आणि नवीन चेअरमन व्हाईस चेअरमन संस्थेच्या कार्यालयात गेले होते नवीन चेअरमन व चेअरमन यांना संस्थेचा कार्यभार होण्यासाठी संस्थेचे दप्तर ताब्यात मिळावे यासाठी दोन दिवसांपूर्वी नवनिर्वाचित चेअरमन सय्यद मतीन अहमद रहीम यांनी समक्ष भेटून संस्थेच्या मार्फत चालवल्या जाणाऱ्या शाळा आणि कॉलेजच्या प्राचार्य मुख्याध्यापकांना लेखी पत्र देऊन संस्थेचे दप्तर ताब्यात मिळावे अशी मागणी केली होती मात्र तेव्हाही संबंधित कार्यालय प्रमुखांनी त्याच नकार दिल्याने त्यावेळी सय्यद मतीन अहमद रहीम यांनी त्या ठिकाणी असलेल्या नोटीस बोर्डवर लेखी पत्र चिकटून दप्तर ताब्यात मिळावे अशी मागणी केली होती.
शुक्रवारी सकाळी पुन्हा सर्व नवनिर्वाचित विश्वस्त संस्थेच्या कार्यालयात गेल्या असता त्या ठिकाणी संस्थेचे सर्वच प्रमुख पदाधिकारी शाळेचे मुख्याध्यापक तसेच कॉलेजचे प्रिन्सिपल क्लार्क हे सर्व रजेवर असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्याचवेळी शाळेमध्ये परीक्षा सुरू असताना सर्वच प्रमुख लोक गैरहजर असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. एकीकडे ही संस्था शाळा आणि कॉलेज चालवत असताना विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून नवनिर्वाचित सदस्य हे कायद्याचा आधार घेऊन शाळेचा कार्यभार हाती घेण्यासाठी प्रयत्न करत असताना शाळेचे सर्वच प्रमुखांनी रजा टाकून गैरहजर राहणे हे कितपत योग्य आहे असा प्रश्न आता समोर येऊ लागला आहे.
चार दिवसांपूर्वी जुन्या विश्वस्त मंडळाने काही घाई नवीन विश्वस्त आणि चेअरमन व चेअरमन यांची निवड जाहीर केली होती त्याच दिवशी धर्मदाय आयुक्त चेंज रिपोर्ट मंजूर करून नवीन विश्वस्त मंडळाची यादी जाहीर केली होती मात्र या नवीन झालेल्या विश्वस्त मंडळाच्या आदेशाला संस्थेच्या प्रशासकीय कार्यालयाकडून केराची टोपली दाखवण्यात आल्याच समोर आले आहे.
शुक्रवारी 14 ऑक्टोंबर रोजी नवीन विश्वस्तांनी संस्थेचा कारभार हाती घेण्यासाठी संस्थेच्या कार्यलयात गेले आणि तिथे हजर असलेल्या काही शिक्षकांना कर्मचाऱ्यांना संस्थेच्या कार्यालयाच्या चाव्या मिळाव्यात म्हणून मागणी केली असता येथील शिक्षकांनी अणि संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी नवीन विश्वस्तांना तुम्ही येथे थांबू नका अन्यथा तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल असे सांगेत विश्वासांना संस्थेच्या कार्यालयाच्या बाहेरच ताटकळत उभे केले
मात्र वाट पाहून अखेर सर्व नवीन विश्वसांनी त्या ठिकाणी असलेल्या नोटीस बरोबर पुन्हा एकदा संस्थेच्या कार्यालयाची सर्व दप्तरे आपल्याला मिळावेत अशा मागणीचे पत्र चिकटवले आहे हे प्रकरण पुन्हा एकदा कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गेले होते मात्र तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दोन्ही बाजूच्या विश्वस्तांना आपापली कायदेशीर कागदपत्रे सादर करावी असे सांगून आता दोन्हीही विश्वस्तांकडून कायदेशीर कागदपत्रे आल्यानंतर ती तपासून पोलीस पुढील कारवाई पोलीस करतील अशी माहिती मिळत आहे.