अहिल्यानगर दिनांक 3 फेब्रुवारी :
पद नव्हे,तर विखेंचा कार्यकर्ता महत्त्वाचा” हे वाक्य सध्या राजकारणात कार्यकर्त्यांचे महत्त्व अधोरेखित करणारे भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक निखिल वारे यांचे व्हॉट्सॲप स्टेटस चर्चेचा विषय बनले आहे. हे स्टेटस नेतेपदापेक्षा जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या निष्ठेला आणि त्यांच्या सक्रियतेला अधिक महत्त्व देते. हे कार्यकर्त्यांच्या मनातील भावनांना हात घालत आहे, जे संघटनेचा कणा असता

“कोणत्याही राजकीय पार्टीमध्ये संघटन ही केवळ एक व्यवस्था नसून तो एक संस्कार आहे. एका सामान्य कार्यकर्ता ते नगरसेवक आणि पक्षातील विविध पदे मिळणे आणि पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी विश्वास टाकणे आणि त्या विश्वासाचं सार्थपणे आव्हान पेलून पक्षाला न्याय देण्याची भूमिका आजपर्यंत निखिल वारे यांनी केली आहे.
काँग्रेस पासून ते भाजप पर्यंतचा नगरसेवक निखिल वारे यांचा प्रवास कोट्यवधी कार्यकर्त्यांचा सन्मान आहे, आणि विखेंचा कार्यकर्ता हा सर्वात मोठे पद अशा शब्दांत असलेले त्यांचे आजचे व्हाट्सअप स्टेटस हा चर्चेचा विषय झाला आहे.
महानगरपालिकेच्या नगरसेवक पदाच्या निवडणुकीच्या आधीपासूनच निखिल वारे यांनी विविध वृत्तवाहिनी आणि वृत्तपत्रांना दिलेल्या आपल्या मनोगतात विखे पाटील यांचे कार्यकर्ते हाच मोठे पद असल्याचा वारंवार उच्चार केला होता. सुरुवातीला त्यांचे नाव महापौर पदाच्या शर्यतीत होते मात्र आरक्षण पडल्यामुळे निखिल वारे यांचे नाव आपोआप मागे पडले. मात्र विखेंचे कार्यकर्ते हेच मोठे पद असून त्याचप्रमाणे पुढील काळात कार्य करत राहणार असा संदेश नगरसेवक निखिल वारे यांनी आपल्या आजच्या व्हाट्सअप स्टेटस मधून दिला आहे असेच दिसून येतेय.
गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खा. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक निखिल वारे काम करत आहेत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असून भारतीय जनता पार्टी ही देशातील एकमेव अशी राजकीय संघटना आहे, जिथे मोठ्या पदांसाठी कोणत्याही विशिष्ट कुटुंबाचा वारसा आवश्यक नसतो. येथे साधा कार्यकर्ता असणे हीच सर्वात मोठी पात्रता आहे. आणि विखेंचा कार्यकर्ता ही सर्वात मोठी पदवी आहे असेही निखिल वारे यांच्या स्टेटस मधून समोर येतंय.





