Homeदेशपाण्यामधून हायड्रोजन वेगळं काढून त्यावर विमान आणि रेल्वे चालवणार केंद्रीयमंत्री नितीन गडकरी

पाण्यामधून हायड्रोजन वेगळं काढून त्यावर विमान आणि रेल्वे चालवणार केंद्रीयमंत्री नितीन गडकरी

advertisement

अहमदनगर दि.१७ जून

मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे, मी करतो तेच बोलतो आणि बोलतो तेच करतो येत्या काळात पाण्यामधून हायड्रोजन वेगळं काढून त्यावर विमान आणि रेल्वे चालवणार असंही ते म्हणाले. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे भाजपाचे जेष्ठ नेते मधुकर पिचड यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमामध्ये बोलताना नितीन गडकरी यांनी हे वक्तव्य केलं.


नितीन गडकरी पुढे म्हणाले की, “येत्या काळात पाण्यामधून हायड्रोजन वेगळं काढून त्यावर विमान आणि रेल्वे चालवणार असल्याचं नितीन गडकरी म्हणाले. अहमदनगरमध्ये पेट्रोलला हद्दपार करा, कार आणि बस इथेनॉलवर चालवा. माझा ट्रॅक्टर बायो सीएनजी वर आहे, आपला शेतकरी अन्नदाता बरोबर ऊर्जादाता बनला पाहिजे.”

तसेच आजची स्थिती ही गहू स्वस्त तर ब्रेड महाग आणि टोमॅटो स्वस्त तर सॉस महाग अशी आहे. जेव्हा गरज होती तेव्हा उसापासून साखर तयार केली. लोक ऊस लावत आहेत, त्यात नफा आहे. आज आपल्या देशात साखर सरपल्स आहे त्यामुळे येत्या काळात साखरे ऐवजी अन्य पदार्थाकडे वळण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितलं.

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular