अहमदनगर दिनांक ३० डिसेंबर
31 डिसेंबर म्हणजेच सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाची सुरुवात करणारा दिवस या दिवशी अनेकांचा वेगवेगळ्या प्लॅन असतो मात्र अलीकडच्या काळात हॉटेलमध्ये जाऊन मित्रा सोबत पार्टी करण्याचे प्रकार तरुणांमध्ये जास्तच वाढले आहेत. मात्र आजकालच्या धावपळीच्या जीवनात अनेक गोष्टींचा तुटवडा जाणू लागला आहे त्याचप्रमाणे रक्ताचा तुटवडा अनेक वेळा जाणवतो. यामुळे रुग्णांची वाढती गरज लक्षात घेऊन जाणीव फाऊंडेशनने सालाबादाप्रमाणे यावर्षीही जिल्हा रूग्णालय रक्तपेढीच्या सहकार्याने रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे.
2023 या सरत्या वर्षात एक अधिकचे पुण्यकर्म आपल्या खात्यात जमा करण्याची सुवर्णसंधी समजून जास्तीत जास्त युवकांनी सदर शिबिरात रक्तदान करून गरीब व गरजू रुग्णांना मदत करावी व इतरांनाही त्यासाठी प्रोत्साहित करावे. रक्तदान हे जीवनदान असते. असे आवाहन जाणीव फाउंडेशन च्या वतीने करण्यात आले आहे.
या रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांना आकर्षक जीवनोपयोगी वस्तू भेट दिली जाणार आहे. रक्तदान शिबिर पाईपलाईन रोडवरील श्रीराम चौक येथे असलेल्या छत्रपती शंभुराजे चौकाजवळ होणार असून 31 डिसेंबर रोजी सकाळी नऊ ते एक वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
नावनोंदणीसाठी संपर्क :
प्रदीप वाखुरे
मो 9075877777
राहुल जोशी
मो 9860006006
ॲड विक्रम वाडेकर
मो 9823577722
शंतनु पांडव
मो 9422222108