Home विशेष अहिल्यानगर महानगरपालिकेकडून नो पार्किंगमधील कारवाईच्या दंडाच्या रकमेत कपात नव्या दरानुसारच दंड...

अहिल्यानगर महानगरपालिकेकडून नो पार्किंगमधील कारवाईच्या दंडाच्या रकमेत कपात नव्या दरानुसारच दंड आकारणीच्या ठेकेदार संस्थेला सूचना आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांची माहिती

अहिल्यानगर – नो पार्किंग झोनमध्ये लावल्या जाणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांवर आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेत महानगरपालिकेकडून कपात करण्यात आली आहे. दुचाकी व चारचाकी वाहनांच्या टोविंग व क्लॅम्पिंग कारवाईसाठी नव्याने दर निश्चित करण्यात आले असून या दरानुसारच दंड आकारणी करण्याच्या सूचना ठेकेदार संस्थेला करण्यात आल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.

Oplus_0

तत्कालीन महासभेने शहरात पे अँड पार्क व नो पार्किंग झोनमध्ये कारवाईसाठी धोरण निश्चित करून कारवाईचे दर व पार्किंग शुल्क निश्चित केले होते. त्यानुसार निविदा प्रक्रिया होऊन दिग्विजय एंटरप्रायझेस या संस्थेला हे काम देण्यात आले आहे. गेल्या वर्षभरापासून टप्प्याटप्प्याने पे अँड पार्कची व नो पार्किंग झोनची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. अद्यापही निश्चित केलेल्या सर्व भागात अंमलबजावणी झालेली नाही. नो पार्किंगमधील वाहनांवर ठेकेदार संस्थेकडून कारवाई होत असताना दंडाच्या रकमेबाबत तक्रारी होत आहेत. नागरिकांकडूनही दंडाची रक्कम कमी करण्यासाठी मागणी होत आहे. सदरचे दर हे तत्कालीन महासभेने निश्चित केले होते. त्यात आता स्थायी समितीने फेरबदल करून दर काही प्रमाणात कमी केले आहेत.

नव्या दरानुसार दुचाकी वाहनावर टोविंग कारवाईसाठी -रुपये ५०० +GST,क्लॅम्पिंग कारवाईसाठी -रुपये ३०० +GST,चारचाकी वाहनाच्या टोविंग कारवाईसाठी -रुपये ८०० +GST,क्लॅम्पिंग कारवाईसाठी -रुपये ४०० +GST असे दर निश्चित करण्यात आले आहेत. यासह जीएसटी करही या रकमेवर आकारण्यात येणार आहे. पे अँड पार्क व नो पार्किंग झोन हे शहराच्या वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आवश्यक असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version