अहमदनगर दि.५ ऑक्टोबर
अहमदनगर शहारा लगतच्या भिंगार येथील सर्वे नंबर / 4 / 8ब पैकी मधील प्लॉट न 07 मध्ये बांधकाम परवागनी मिळवण्यासाठी बबन भागचंद बेरड यांनी १५ एप्रिल 2019 रोजी उपविभागीय कार्यालयात अर्ज केला होता.या पत्रात परवानगी घेणेकामी बिल्डरने कोठुनतरी आर्मी हेडक्वार्टरचे पत्र घेवुन बांधकाम परवानगी
घेतलेली असल्याबाबतचा अर्ज दिला होता. या पत्राच्या आधारे आर्मी स्टेशन हेडक्वार्टरच्या पत्रा बाबत खात्री केली असता हे पत्र आर्मी स्टेशन हेडक्वार्टर कडून दिले नसल्याचे आढळून आले होते.
याप्रकरणी उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून खूप उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आता पोलीस तपास सुरू असून याची दखल लष्कर विभागाने सुद्धा गांभीर्याने घेतली आहे पोलिसांच्या सोबत सदन कमांड मिल्ट्री यांनी संयुक्त तपास सुरू केला होता. कारण थेट आर्मी स्टेशन हेडकॉटरचे शिक्का असलेले पत्र दिल्या गेल्यामुळे हे लष्कराच्या बाबतीत गंभीर बाब आहे
ज्या लोकांनी भूखंडाबाबत अर्ज केले होते आणि त्यांनी बनावट एनओसी दिली होती अशा लोकांविरुद्ध गुन्हा दाखल न करता अज्ञात लोकांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.आता या प्रकरणात कोतवाली पोलीस पथकाने आणि सदन कमांड मिल्ट्री यांनी राजेंद्र देसराज सिंग ठाकूर या कर्मचाऱ्याला अटक केली असून पोलीस राजेंद्र ठाकूर यांच्याकडून बसून चौकशी करत आहेत ठाकूर यांच्याकडून या प्रकरणातील साखळी बाहेर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे या घटनेचा तपासून पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गजेंद्र इंगळे, अभय कदम,सलीम शेख, सुमीत गवळी, बंडू भागवत, रवींद्र टकले, अतुल काजळे, दीपक बोरूडे, करत आहेत.