Homeक्राईमसंरक्षण विभागाचे खोटे शिक्के असलेल्या NOC प्रकरण लष्कराचे दिल्लीचे वरीष्ठ अधिकारी नगर...

संरक्षण विभागाचे खोटे शिक्के असलेल्या NOC प्रकरण लष्कराचे दिल्लीचे वरीष्ठ अधिकारी नगर मध्ये तळ ठोकून पुरावे असूनही त्या भूकंडधारकांविरोधात उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून गुन्हा दाखल का नाही?

advertisement

अहमदनगर दि.30 सप्टेंबर

अहमदनगर शहारा लगतच्या भिंगार येथील सर्वे नंबर / 4 / 8ब पैकी मधील प्लॉट न 07 मध्ये बांधकाम परवागनी मिळवण्यासाठी बबन भागचंद बेरड यांनी १५ एप्रिल 2019 रोजी उपविभागीय कार्यालयात अर्ज केला होता.या पत्रात परवानगी घेणेकामी बिल्डरने कोठुनतरी आर्मी हेडक्वार्टरचे पत्र घेवुन बांधकाम परवानगी
घेतलेली असल्याबाबतचा अर्ज दिला होता. या पत्राच्या आधारे आर्मी स्टेशन हेडक्वार्टरच्या पत्रा बाबत खात्री केली असता हे पत्र आर्मी स्टेशन हेडक्वार्टर कडून दिले नसल्याचे आढळून आले.

याप्रकरणी उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून खूप उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आता पोलीस तपास सुरू असून याची दखल लष्कर विभागाने सुद्धा गांभीर्याने घेतली आहे कारण थेट आर्मी स्टेशन हेडकॉटरचे शिक्का असलेले पत्र दिल्या गेल्यामुळे हे लष्कराच्या बाबतीत गंभीर बाब आहे त्यामुळे दिल्ली येथील लष्कराचे वरिष्ठ अधिकारी नगरमध्ये तळ ठोकून असून त्यांनी आपल्या पद्धतीने या प्रकरणाचा तपास पोलिसांबरोबर सुरू केला आहे.

श्रीनिवास अर्जुन उपविभागीय अधिकारी यांच्याकडून बनावट NOC प्रकरणात मुळ आरोपींना वाचवून अज्ञात इसमाविरोधात फिर्याद दाखल करण्याचे कार्यवाही झाली असल्याचा आरोप करत श्रीनिवास अर्जुन यांच्या विरोधात शिस्तभंगाची कार्यवाही होऊन अर्ज केलेल्या तिन्ही भुखंड धारकांचे नावेनिशी गुन्हा दाखल करण्याबाबत उपविभागीय अधिकारी नगरभाग अहमदनगर यांना योग्य ते आदेश दयावे अशी मागणी महसूल विभागाचे आपर सचिवांकडे निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्ते शाकिर शेख यांनी केली आहे.

ज्या लोकांनी भूखंडाबाबत अर्ज केले होते आणि त्यांनी बनावट एनओसी दिली होती अशा लोकांविरुद्ध गुन्हा दाखल न करता अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा हेतू काय असा प्रश्न समोर येऊ लागला आहे. या बनावट एनओसी देण्याची एक मोठी साखळी असून अनेक बनावट एनओसी चौकशीत समोर येऊ शकतात अशी धक्कादायक माहिती आता समोर येऊ लागली आहे त्यामुळे लष्कराने ही बाब गंभीर घेतली आहे

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular