नाशिक (प्रतिनिधी) – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि युवाशक्ती फाऊंडेशन (नाशिक) यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या शुक्रवार दिनांक १२ डिसेंबर २०२५ रोजी पहिल्या रोजगार मेळावयाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत नाशिक येथील विद्यापीठ मुख्यालयातील कृषी विज्ञान केंद्र येथे हा मेळावा होईल. विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्र – कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या नियोजनाखाली होणाऱ्या या मेळाव्यासाठी महाराष्ट्रातील २० पेक्षा अधिक नामांकित व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमधील २१५० हून अधिक रिक्त पदे उपलब्ध असणार आहेत.
या रोजगार मेळाव्यासाठी १८ ते ३५ वर्ष वयोगटातील सर्व शाखेतील पदवीधर, आय.टी.आय. (सर्व ट्रेड्स), डिप्लोमा, इंजिनिअरिंग (इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल), सी.एन.सी. ऑपरेटर आणि सीपेट (CIPET) शिक्षण पूर्ण केलेले तसेच दहावी, बारावी उत्तीर्ण व अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी मोफत अर्ज करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिक माहितीसाठी ९८२२५ ४४०९४, ९९२२३ ७९३१९, ८६९८५ ०४७५२, ९०२१४ २२४७९ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठ प्रशासन व आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.




