अहमदनगर दि.२९ ऑक्टोबर
अहमदनगर म्हणजे काना मात्रा नसलेला जिल्हा नगर जिल्ह्यात संतांची भूमी त्याचबरोबर इतिहासकालीन अनेक गोष्टी आहेत.अहमदनगर मध्ये जेव्हा काही खाण्याचा विषय येतो तेव्हा नगरचा वडापाव तर्री
मारलेली मिसळ पाव तसेच नगरी तडका असलेले झणझणीत मटणावर ताव मारणारी माणसंही आहेत.
मटण, तर्रीचा विषय आला की मग नगर मधील अनेक
हॉटेल्सची नावं डोळ्यासमोर येतात. मात्र आता हॉटेलमध्ये न जाता हॉटेल सारखी चव आणि घरगुती मसाल्यांनी तयार केलेले चुलीवरचे मटण खायचे असेल तर एकदा नक्कीच मटणवाला क्लाऊड किचन मधून
जेवण मागवून बघाच मग कळेल मटणाची चव काय असते ते…
चुलीवरचं घरगुती मसाल्याची चव असलेले झणझणीत गावरान मटण त्याच्या सोबत बाजरीची भाकरी आणि रुचकर भात हे नुसतं ऐकलं तरी तोंडाला पाणी सुटतं. नगरच्या नॉन व्हेज प्रेमींसाठी ही मेजवानी महेश तनपुरे यांनी सुरू केली आहे. त्यांच्या हातची चवच भन्नाट आहे. त्यांना नॉनव्हेज पदार्थ बनवण्याची लहान पणापासून आवड आहे. या आवडीतूनच त्यांनी हा व्यवसाय करण्याचं ठरवलं आणि
मटणवाला क्लाऊड किचन सुरू झालं. या ठिकाणी मटण चिकन स्पेशल आहे. हे मटण खाण्यासाठी अतिशय स्वादिष्ट आहे, या मटणासोबत चुलीवरची बाजरीची भाकरी मिळते. घरी पाहुणे आले किंवा मित्रांसोबत पार्टीला जायचंय किंवा एखादा छोटा कार्यक्रम या सर्वांसाठी उपयुक्त असं मटणवाला क्लाऊड किचन नगर मध्ये सुरू झाले असून एकदा तुम्ही पार्सल मागूनच पहा त्यानंतर पुन्हा नॉनव्हेज इतरत्र खाण्यासाठी जाणारच नाही अशी चव तुमच्या जिभेवर रेंगाळत राहील…तर मग उचला मोबाईल आणि डायल करा
9001131818