Homeक्राईमराष्ट्रीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याचे रंगेल चाळे...महिलेला मेसेज करून द्यायचा त्रास..अंधारात माफी मागून पाडाल...

राष्ट्रीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याचे रंगेल चाळे…महिलेला मेसेज करून द्यायचा त्रास..अंधारात माफी मागून पाडाल पडदा…

advertisement

अहिल्यानगर दिनांक 25 जून
अहिल्यानगर शहराच्या भिंगार उपनगरात एका राष्ट्रीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने एका महिलांना मेसेज करून त्रास देण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र हा प्रकार पोलिसांपर्यंत जाईल या भीतीने अखेर माफी मागत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रकार समोर आला असून हा रंगेल पदाधिकारी स्वतःला राष्ट्रीय पक्षाचा पदाधिकारी म्हणत मिरवत असताना एका अबला महिलेला व्हॉट्स ॲप वर मेसेज करून फोन करण्याची बळजबरी करत होता.

एका झेरॉक्स दुकानावर कामानिमित्त गेलेल्या महिलेचा नंबर मिळाल्यानंतर त्या राष्ट्रीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने महिलेला मेसेज करणे सुरू केले.मी असे काम करतो इथे नोकरी करतो.या पक्षाचा पदाधिकारी आहे असे मेसेज सुरू केले. मला ओळखल का? व्हॉट्स वरून कॉल करा. आणि त्याची हिम्मत एवढी वाढली की थेट त्या महिलेला फोटो टाका म्हणून बळजबरी करू लागला होता सुरुवातीला आलेल्या मेसेजला त्या महिलेने दुर्लक्ष केले मात्र तो पदाधिकारी मेसेज करणे काही थांबवेना त्याला उत्तर मिळत नसले तरी तो सतत मेसेज करत असल्याने अखेर त्या महिलेने आपल्या कुटुंबीयांना हा प्रकार सांगितला.

या प्रकाराबाबत त्या पदाधिकाऱ्याला महिलेच्या कुटुंबीयांनी फोन करून तुम्ही असा प्रकार का केला असा जाब विचारला असता सुरुवातीला त्याने उडवा-उडुची उत्तरे दिली विशेष म्हणजे त्यांनी ज्या संस्थेत काम करत होता त्या संस्थेच्या नावावर असलेल्या मोबाईल नंबरचाही वापर केला होता. उडवा उडवी चे उत्तर मिळाल्यानंतर त्या कुटुंबीयांनी पोलीस स्टेशनमध्ये जाण्याचा पवित्र घेतल्यानंतर आपले भांडे समाजासमोर फुटेल या भीतीने त्या राष्ट्रीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने अंधारात पाय धरून इथून पुढे अशी चूक होणार नाही अशी माफी मागत या प्रकरणावर पडदा टाकण्याची विनंती केली. आणि या प्रकरणावर पडदा पडला आहे.

हे प्रकरण जरी झाकले गेले असले तरी देशात आणि राज्यात सत्ताधारी असलेल्या राष्ट्रीय पक्षाने आपला अजेंडा महिलांना मान सन्मान आणि सक्षमीकरण करण्याचा ठेवला आहे. ऑपरेशन सिंदूर राबवून महिलांना सन्मान देणारा हा पक्ष.त्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्याने अशा प्रकारे महिलांना फोन करून त्रास देणे म्हणजे पक्षाच्या अजेंड्याला तिलांजली दिल्यासारखे होईल.

महिलांनी सुद्धा आता काळजी घेणे फार गरजेचे आहे. मोबाईल रिचार्ज ला अथवा झेरॉक्स दुकानात गेल्यानंतर आपला मोबाईल नंबर देताना काळजी घेणे गरजेचे आहे.महिलेला त्रास देणारा पदाधिकारी स्वतः झेरॉक्सचे दुकान बँकेत काम आणि महिलांना बदनाम करण्याचे काम करत असून अशा लोकांपासून सावध राहणे गरजेचे आहे.

त्या महिलेच्या कुटुंबीयांनी आपल्या कुटुंबीयांची या प्रकरणात पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर फरफट होईल म्हणून दोन पावले मागे घेत गुन्हा दाखल केला नाही. मात्र महिलांना त्रास देणाऱ्या त्या राष्ट्रीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यासारख्या नीच प्रवृत्तीचे लोक याचा फायदा घेतात. अनेक महिला आपल्या स्वतःच्या इज्जती खातर तक्रार करत नाही आणि असे नीच लोक त्याचाच फायदा घेऊन महिलांना बदनाम करतात त्यामुळे महिलांनी आता अशा निच प्रवृत्तीच्या लोकांना न घाबरता त्यांना धडा शिकवणे गरजेचे आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular