अहिल्यानगर दिनांक २५ ऑक्टोबर
-कोविड काळात रुग्णाचा मृत्यू व बनावट कोरोना रिपोर्टसह इतर कलमानुसार जाणार दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी डॉक्टरांना पोलिसांनी अद्याप अटक केली नसल्याने शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. संबंधित डॉक्टरांना तात्काळ अटक करून या प्रकरणाचा सखोल तपास तसेच संघटित गुन्हेगारीचे कलम व वाढवण्यात यावे, अशी मागणी जाधव यांनी पोलिस उपअधीक्षक दिलीप टिपरसे यांच्याकडे केली आहे.
तसेच महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांची भेट घेऊन गिरीश जाधव यांनी आरोपी असलेले डॉ. गोपाळ बहुरुपी (रा. न्युक्लीअस हॉस्पिटल), डॉ. सुधीर बोरकर (रा. पाईपलाईन रोड, अहिल्यानगर), डॉ. मुकुंद तांदळे (रा. सावेडी, अहिल्यानगर), डॉ. अक्षयदीप झावरे पाटील (रा. अहिल्यानगर), डॉ. सचिन पांडुळे (रा. अहिल्यानगर), डॉ. विखे पाटील मेमोरिअल हॉस्पिटल, या सर्व डॉक्टरांचे संबंधित रुग्णालय तपासणी करण्याची मागणी केली होती. यावर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांनी आरोग्य विभागाला आदेश देऊन सर्व डॉक्टरांचे रुग्णालय तपासणी करण्यासाठी पथके रवाना करण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे आज डॉक्टर गोपाळ बहुरूपी यांचे न्युक्लीअस हॉस्पिटल मध्ये जाऊन महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने तपासणी केली आहे. यामध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याची माहिती येत आहे.
या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे जाधव यांनी उपअधीक्षक दिलीप टिपरसे यांची भेट घेऊन संशयित आरोपींना तत्काळ अटक करावी अशी मागणी केली. तसेच, गुन्ह्यात संघटित गुन्हेगारी कायद्याचे कलम वाढवण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.





