Homeक्राईमनुपूर शर्माचे स्टेटस ठेवतो म्हणून युवकास तलवारीने मारहाण अहमदनगर जिल्ह्यात घडली घटना

नुपूर शर्माचे स्टेटस ठेवतो म्हणून युवकास तलवारीने मारहाण अहमदनगर जिल्ह्यात घडली घटना

advertisement

अहमदनगर दि.६ ऑगस्ट

नूपर शर्मा यांचे समर्थन करतो म्हणून तुझा उमेश कोल्हे करू असे म्हणत कर्जत शहरात प्रतिक उर्फ सनी राजेंद्र पवार या युवकावर गुरुवारी रात्री एका गटाने हल्ला केला. यामध्ये तो गंभीर रित्या जखमी झाला असून त्याला नगर येथील मॅक केअर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याचे तीव्र पडसाद कर्जत शहरांमध्ये उमटले आहेत.तर शुक्रवारी कर्जत शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला होता याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून, आठ जणांवर अॅट्रॉसिटीसह भादवी कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे.

याबाबत अमित राजेंद्र माने यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये
म्हटला आहे की, सनी पवार व मी शहरातील अक्काबाई
नगर परिसरामध्ये राशीन येथे अण्णाभाऊ साठे जयंती
कार्यक्रमास जाण्यासाठी थांबलेलो असताना त्या ठिकाणी दहा ते पंधरा युवकांनी हातामध्ये गज काठ्या हॉकीची स्टिक तलवार यांच्या साह्याने आमच्यावर हल्ला केला. हल्लेखोर पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार व बुलेट पल्सर व इतर वाहनांवर आले होती. यावेळी त्यांनी जातीय वाचक शिवीगाळ करून तुला खूप हिंदू धर्माचा किडा आला आहे का असे म्हणून शिवेगाळ करून हातातील तलवारीने वार केले, व तू सारखे सोशल मीडियावर आय सपोर्ट नपुर शर्मा असे स्टेटस ठेवत असतो व इंस्टाग्राम वरही टाकत असतो असे म्हणून तुझा आम्ही उमेश कोल्हे करू असे म्हणाले.

या घटनेनंतर या घटनेचा विविध हिंदुत्ववादी संघटनांनी
निषेध करीत कर्जत बंद ची हाक दिली होती. त्यानुसार
युवकांनी शहरातून मोर्चा काढून पोलीस निरीक्षक यादव
यांना निवेदन दिले. तर आज राशीन बंदची हाक देण्यात आली आहे

या प्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत या घटनेबाबत वक्तव्य केले असून त्यामुळे आता हे प्रकरण गंभीर वळणावर जात आहे मात्र हे प्रकरण पूर्ववैमन्यासतून घडले का नूपूर शर्मा हाच मुद्द्यावरून घडले याबाबत पोलीस तपास करत असल्याचे पोलीस अधीक्षकांनी यावेळी बोलताना सांगितले.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular