अहिल्यानगर दिनांक १८ ऑगस्ट
परदेशात चांगली नोकरी आणि गोलगठ्ठ पगाराचे आमिष दाखवून फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. यातूनच मानवी तस्करी प्रकार वाढत असून असाच एक प्रकार नगर शहरातील तरुणाबरोबर घडला आहे.मात्र त्याचे दैव्य बलवत्तर म्हणून तो पुन्हा सुखरूप घरी नगर मध्ये परतला आहे. तो परतला असला तरी त्याच्या बरोबर घडलेली हकीकत एखाद्या चित्रपटाला शोभेल अशीच आहे.

नगर (nagar)शहरातील एक उच्चशिक्षित तरुण बाहेरच्या देशात काही वर्ष नोकरी करून आला होता. बाहेरच्या देशातील करार संपल्यामुळे तो दुसऱ्या नोकरीच्या शोधात असताना त्याच्या एका नाशिकच्या एका एजंट मित्राने दुबई येथे चांगली कंपनी असून त्या ठिकाणी नोकरी आहे. चांगला पगार आणि राहण्याची सोय असल्याचे सांगून तुम्ही दुबईला या असे फोनवरून संपर्क साधून माहिती दिली. मित्राच्या बोलण्यावर विश्वास ठेवून नगर मधील तो तरुण दुबई येथे गेला दुबई विमानतळावर उतरल्यानंतर त्यांनी त्या एजंटला फोन लावला त्यावेळी त्या एजंट ने तुम्ही एका हॉटेलमध्ये मुक्काम करा पुढची माहिती तुम्हाला उद्या सांगण्यात येईल असे सांगितले.दुसऱ्या दिवशी त्यांना दुबई वरून बँकॉक येथे विमानाने जाण्यास सांगितले. त्यावेळी नगरच्या तरुणाला शंका आली मात्र नोकरीच्या अशाने आणि विश्वासवर तो पुढे पुढे जात राहिला. बँकॉक वरून त्याच्या बरोबर कंपनीचा एक एजंट जोडला गेला त्याच्या बरोबर नगराचा तो तरुण एवढा पुढे गेला की लाओस येथील गोल्डन ट्रँगल या ठिकाणी जाऊन पोहोचला. या प्रवासात काही काळ तो बसने प्रवास करत होता तर काही वेळ पायी चालून अक्षरशा एका राज्याची सीमा त्यांनी भिंतीवर उड्या टाकून ओलांडली असल्याचीही धक्कादायक आपबिती त्या तरुणाने सांगितली आहे.
म्यानमार (myanmar )आणि चीनच्या (chin )सीमेलगत असणाऱ्या लाओस येथील गोल्डन ट्रँगल स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये (goldan trangal econami zone)या शहरात पोचल्यावर नगरच्या तरुणाला एका हॉटेलवर (hotel)ठेवण्यात आले. त्यावेळी त्याचा पासपोर्ट(pasport )आणि मोबाईलफोन (mibail )जमा करून घेण्यात आला. मात्र आता आपण पुरते फसलो हे त्याच्या लक्षात आले होते. त्या ठिकाणी काही मराठी माणसेही त्याला त्या परिसरात भेटली त्यांनी सांगितले तुम्ही येथे कशाला आलात आता तुम्ही चांगलेच अडकून जातल. विशेष म्हणजे त्या तरुणाला जे हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते त्या हॉटेलच्या परिसरात जवळपास हजारो तरुण विविध देशांमधून म्हणजेच भारत,(india )पाकिस्तान (pakistan),बांगलादेश(bangladesh)अशा ठिकाणावरून नोकरीच्या अशाने त्या ठिकाणी आले होते आणि गुंतून पडले होते.
दुसऱ्या दिवशी नगरच्या तरुणांसह त्याच्याबरोबर आलेल्या हरियाणा आणि गुजरात (gujrat)मधील काही तरुणांना कामाचे स्वरूप म्हणून एका ऑफिसमध्ये नेण्यात आले. त्या ठिकाणी कॉम्प्युटर समोर बसून यावरून तुम्ही फेसबुक तसेच सोशल मीडियावरील विविध खोटे अकाउंट महिलांच्या नावाने उघडून तुमच्या राज्यातील आणि ओळखीच्या लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायची त्यांच्याशी संपर्क करायचा आणि त्यांना एक विशिष्ट कंपनीत पैसे गुंतवण्यासाठी प्रेरित करायचे असे काम करायचे असल्याचे सांगण्यात आले. मात्र हे काम आपल्याला जमणार नाही असे सांगितल्यानंतर त्या तरुणाला आणि इतर दोघांना पुन्हा हॉटेलवर नेण्यात आले आणि त्याला इलेक्ट्रिक शॉक देऊन काम करण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर त्या ठिकाणी जेवण म्हणून बदक, साप,बेंडकुळी यांचे मटन असल्यामुळे नगरच्या तरुणाने आणि त्याच्याबरोबर असलेल्या भारतीय तरुणांनी जवळपास सहा दिवस अन्नप्राशन केले नाही.या सहा दिवसात काही तरुणांनी त्या ठिकाणी उंच इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याच्या घटनाही त्यांनी डोळ्यादेखत पाहिल्या.
आपल्याकडून काम होणार नसल्यामुळे पुन्हा भारतात जाण्यासाठी आपला पासपोर्ट द्यावा मी पुन्हा भारतात जातो असे वारंवार सांगूनही त्या तरुणाला पासपोर्ट मिळत नव्हता. अखेर तेथील एका एजंटने एक लाख रुपये मागून घे आम्ही तुझा पासपोर्ट देऊ अशी अट त्या नगरच्या तरुणासमोर ठेवली. अखेर मोबाईल वरून नगरमध्ये आपल्या घरच्यांशी संपर्क साधून त्या तरुणाने कसेबसे एक लाख रुपये ऑनलाइन पद्धतीने मागून घेतले त्यासाठी ही काही विशिष्ट लोकांचे नंबर देण्यात आले होते. त्यावर ते पैसे मागून घेऊन अखेर त्या तरुणाची त्या परिसरातून सुटका करण्यात आली.
तेथील काही भारतीय दुकानदार आणि इतर भारतीय नागरिकांच्या मदतीने अखेर तो तरुण भारतात आणि नगरमध्ये पोचला. मात्र नगर पासून ते लाओस मधील
गोल्डन ट्रँगल स्पेशल इकॉनॉमिक झोन मधील प्रवास अत्यंत भयानक असल्याचं आणि हा प्रकार मानवी तस्करीचा असल्याचे त्याने सांगितले. अनेक तरुण त्या ठिकाणी अनेक वर्षांपासून अडकून पडले आहेत. तिथून सुटका होण्यासाठी आणि पासपोर्ट मिळवण्यासाठी ठराविक रक्कम सांगितली जाते. मात्र ती वेळेवर भेटली नाही तर रोज त्या रकमेत वाढ होत जाते. त्यामुळे अनेक तरुण त्या ठिकाणी अडकून पडले आहेत की ज्यांचे कुटुंबीय एवढ्या मोठ्या रकमा पाठवू शकत नाहीत अशा तरुणांचे पासपोर्ट मानवी तस्करी करणाऱ्यांकडे जमा आहेत.
गोल्डन ट्रँगल स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये असे प्रकार वाढल्यामुळे आता लाओस सरकारने त्या ठिकाणी असलेल्या सायबर-फसवणूक करणाऱ्या एजंटच्या बाबतीत कडक धोरण घेतले असून मागील आठवड्यात लाओस सरकारने जवळपास ७७१ संशयितांना अटक केली आहे. तर 25 ऑगस्ट पर्यंत जे कोणी या परिसरात अनधिकृतपणे वास्तव्य करत आहेत अशांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत.
तसेच लाओ मध्ये पासपोर्ट आणि कामगार फसवणूक ही एक गंभीर समस्या आहे ज्याचे कायदेशीर आणि व्यावहारिक परिणाम लाओ नागरिक आणि परदेशी लोकांसाठी आहेत. ज्यांचे पासपोर्ट जप्त केले गेले आहेत किंवा ज्यांना त्यांच्यासाठी पैसे देण्यास सांगितले गेले आहे ते लाओ अधिकाऱ्यांना, विशेषतः पोलिस किंवा संबंधित इमिग्रेशन कार्यालयांना परिस्थितीची तक्रार करू शकतात. असे आवाहन लाओ पोलीस प्रशासनाने केली आहे.





