Homeशहरऐन दिवाळीत अहमदनगर शहराचा पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत

ऐन दिवाळीत अहमदनगर शहराचा पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत

advertisement

अहमदनगर दि.२० ऑक्टोबर

गुरुवारी दि.२० ऑक्टोबर रोजी अहमदनगर शहरास पाणीपुरवठा करणारी नविन मुख्य ८१३ एम.एम. जलवाहिनी विळद घाट येथील ओम गुरूदेव आश्रम समोर फुटल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

सायंकाळी ४.०० वाजलेच्या अहमदनगर शहरास पाणीपुरवठा करणारी नविन मुख्य ८१३ एम. एम. एम. एस. जलवाहिनी विळद घाट येथील ओम गुरूदेव आश्रम समोरील ठिकाणी पाण्याच्या व हवेच्या दाबाने फुटलेली आहे. सदर जलवाहिनी दुरूस्तीचे काम महानगरपालिकेने तातडीने हाती घेतलेले आहे. परंतू दुरूस्ती कामास अवधी लागणार आहे. सदर जलवाहिनीद्वारे होणारा पाणी उपसा बंद असल्याने शहर वितरण व्यवस्थेच्या पाण्याच्या टाक्या वेळेत भरणे शक्य होणार नाही. त्यामुळे शुक्रवार दि. २१/१०/२०२२ रोजी रोटेशननुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास म्हणजेच सर्जेपुरा, तोफखाना, सिध्दार्थनगर, लालटाकी, दिल्लीगेट, नालेगाव, चितळे रोड,
ख्रिस्त गल्ली, माळीवाडा, माणिकचौक, आनंदी बाजार, जुने म.न.पा. कार्यालय परिसर, पंचपीर चावडी, बालिकाश्रम रोड परिसर इत्यादी ठिकाणी उशिराने व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
तसेच काल दि.१९/१०/२०२२ रोजी खंडित वीज पुरवठयामुळे बुरूडगाव रोड, सारस नगर, स्टेशन रोड इत्यादी उपनगर भागास उद्या दि. २१/१०/२०२२ रोजी पाणीपुरवठा नेहमीच्या वेळेत करणेत येणार आहे. तरी नागरीकांनी याची नोंद घेवून असलेल्या पाण्याचा वापर काटकसरीने करून  महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे मनपाने दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हंटले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular