Homeशहरअभियंता दिना दिवशीच नगर शहरातील वर्दळीच्या रस्त्यावर पडले भलमोठे भगदाड

अभियंता दिना दिवशीच नगर शहरातील वर्दळीच्या रस्त्यावर पडले भलमोठे भगदाड

advertisement

अहमदनगर दि.१५ सप्टेंबर
अहमदनगर शहरातील वाडिया पार्क समोरील रस्त्यावर गुरुवारी दुपारी अचानक रस्त्याला भलेमोठे भगदाड पडले असून या रस्त्या खालून वाहणारी गटार उघडी पडली आहे. विशेष म्हणजे आज अभियंता दिन असल्याने महानगरपालिकेतील बहुतेक अभियंते नाशिक येथे विविध पुरस्कार वितरण समारंभासाठी गेले होते. आणि आज अभियंता दिनी नगर शहरातील रस्त्याला भले मोठे भगदाड पडले आहे. हा रस्ता अत्यंत रहदारीचा असून ज्या ठिकाणी आसपास फळ विक्रेते उभे असतात त्यामुळे अनेक नागरिक फळे घेण्यासाठी या ठिकाणी नेहमीच गर्दी करत असतात मात्र दैव बलत्तर म्हणून आज दुपारी रस्ता खचला असताना या ठिकाणी रहदारी कमी प्रमाणत होती अन्यथा एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता या ठिकाणी होती. दुपारी 2 च्या दरम्यान पडलेल्या भगदाडाला मनपा कडून सायंकाळी 7 वाजता बेरिकेड लावण्यात आले एवढी तत्परता महानगरपालिकेने दाखवल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.अहमदनगर शहरातील अनेक रस्त्यांची चाळण झाली असून अनेक दिवसांपासून रस्ते जैसे थे आहेत.

यावर्षी पावसाने नगर शहराला चांगलेच झोडपून काढले असल्याने आणि फेज टू तसेच विविध इंटरनेटच्या भूमिगत वायर टाकण्याच्या कामामुळे ठिकठिकाणी रस्ते खोदण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण शहर सध्या खड्डेमय झाले आहे. महानगरपालिका या खड्ड्यांना बुजवण्याचं काम करत आहे मात्र खड्यांमध्ये डांबरच नसल्याने खडी लगेच उघडी पडताना चे चित्र ठिकठिकाणी पाहायला मिळते. गेल्या अनेक दिवसांपासून खड्ड्यांबाबत अनेक वेळा आंदोलन झाले मात्र नगर शहरातील खड्डे मात्र काही बुजवले जात नाही हे विशेष आज अभियंता दिना दिवशी नगर शहरातील वाडीया पार्क संकुला मधील गांधीजींच्या पुतळा समोरील रस्त्यावरच भगदाड पडल्याने हाच नगर शहराचा विकास असल्याचं मिश्कील पणे बोललं जातंय.

पहा व्हिडीओ

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular