अहमदनगर दि ३७ ऑगस्ट
अहमदनगर जिल्हा पोलिस दलाच्या पावसाळी क्रीडा स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी झालेल्या रस्सी खेच स्पर्धेत अधिकारी संघ विरुद्ध तरी संघात जिंकण्यासाठी चांगलीच रस्सीखेच झाली एका प्रयत्नात पोलीस कर्मचारी यांनी बाजी मारली तर दुसऱ्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्यांच्या टीमने बाजी मारली पावसाळी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर अप्पर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या हस्ते झाले होते. या स्पर्धा गुरुवारी (दि. 25) सुरू झाल्या असून आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस होता.
या स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील एकुण 6 विभाग सहभागी झाले असून, पोलीस क्रिडा स्पर्धा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात आल्या क्रीडा स्पर्धेमध्ये ऍथलेटिक्स, भालाफेक, थाळीफेक, गोळाफेक, कबड्डी, खोखो, बास्केटबॉल, कुस्ती, बॉक्सींग, व्हॉलीबॉल, फुटबॉल असे सामने आयोजित करण्यात आले होते.
पहा व्हिडीओ
सदरच्या पोलीस क्रीडा स्पर्धा वेळी नगर जिल्ह्यातील पोलीस उपअधीक्षक (गृह) संजय नाईकपाटील तसेच राखीव पोलीस निरिक्षक अनुजकमार मडामे, कोतवालीचे पोलीस निरिक्षक संपत शिंदे, पोलीस निरिक्षक भोसले, भिंगार कॅम्पचे सहाय्यक पोलीस निरिक्षक तसेच इतर पोलीस अधिकारी व जिल्ह्यातील पोलीस खेळाडु उपस्थित होते.