पुणे दि.१८ नोव्हेंबर : वाहतूक पोलिसांनी एका महिलेची गाडी उचलली. त्याची चौकशी महिला पोलीस कर्मचाऱ्याकडे करून तिला अश्लील शिवीगाळ करून चप्पलने मारहाण करण्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. सीता रमेश पुजारी (वय ३५, रा. ताडीवाला रोड) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे.
सीता पुजारी यांची गाडी सर वाहतूक पोलिसांनी उचल्यानंतर सीता पुजारी या टिळक चौकात आल्या. त्यांनी तेथे उपस्थित असलेल्या महिला पोलिसाला येऊन माझी गाडी येथे का आणली, अशी विचारणा केली. त्यावर महिला पोलिसाने, मला माहिती नाही, तुमची गाडी येथे का आणली आहे. मी या विभागाची नसून, तुम्ही शेजारील ट्रॅफिक ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करा, असे सांगितले. त्यावर सीता पुजारी यांनी तू पोलीस खात्यात असून तुला माहीत नाही का?, असे उद्धटपणे बोलून पुजारी यांनी पायातील चप्पल काढून महिला पोलिसाच्या पायावर, छातीवर मारहाण केली अश्लील शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा आणला.याप्रकरणी विश्रामबाग वाहतूक विभागातील महिला पोलीसाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. हा प्रकार अलका टॉकीजजवळील टिळक चौकात घडला होता.