Homeशहरवन्स अपॉन अ टाइम इन मुंबई फेम अभिनेत्री प्राची देसाईंच्या उपस्थितीत यावेळी...

वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई फेम अभिनेत्री प्राची देसाईंच्या उपस्थितीत यावेळी रंगणार गंगा उद्यान चौकात दहीहंडी उत्सव

advertisement

अहमदनगर दि.१६ ऑगस्ट

१९ ऑगस्ट रोजी गोपाळकालाच्या निमित्ताने सावेडी उपनगर मधील अजिंक्य युवा प्रतिष्ठानच्या वतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात आले असून या दहीहंडीच्या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई” या हिंदी चित्रपटात भूमिका करणारी सिनेअभिनेत्री प्राची देसाई ही राहणार आहे.

सावेडी उपनगरातील गंगा उद्यान चौकात या दहीहंडीचे आयोजन माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर आणि अजिंक्य युवा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. सिने अभिनेत्री प्राची देसाई हिच्या उपस्थितीत सायंकाळी सातच्या सुमारास भव्य दिव्य असे दहीहंडीचे आयोजन करण्यात आले असून एक लाख अकरा हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. प्राची देसाई आमदार संग्राम जगताप यांच्या व्यतिरिक्त अन्य कलाकारांची या ठिकाणी उपस्थिती राहणार आहे.

अभिनेत्री प्राची देसाई हिने टीव्ही मालिका “कसम से” मधील सर्वोत्कृष्ट फ्रेश न्यू फेस (महिला) साठी “इंडियन टेली अवॉर्ड”, टीव्ही मालिका “कसम से” मध्ये राम कपूरसोबत सर्वोत्कृष्ट जोडीसाठी “इंडियन टेली अवॉर्ड”,
२००९ साली “रॉक ऑन!!” चित्रपट “आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्कार” ,2011 साली “वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई” चित्रपटातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी “झी सिने पुरस्कार”,2013 मध्ये ‘बोल बच्चन’ चित्रपटातील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी “स्टारडस्ट अवॉर्ड” प्राप्त केले आहेत.

तर रॉक ऑन,लाईफ पार्टनर, वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई, तेरी मेरी कहानी, बोल बच्चन, आय, मी और मैं, पोलिसगिरी या चित्रपटात अभिनय केला आहे.

या दहीहंडीच्या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन,नगरसेविका श्रीमती शोभाताई बोरकर व अजिंक्य युवा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular