Home क्राईम कांदा व्यापाऱ्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांच्या टोळीला लवकरात लवकर अटक करावी या मागणीसाठी...

कांदा व्यापाऱ्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांच्या टोळीला लवकरात लवकर अटक करावी या मागणीसाठी व्यापारी आणि राजकीय पदाधिकाऱ्यानी घेतली अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांची भेट

अहमदनगर दि.१४एप्रिल
अहमदनगर शहरातील मार्केटयार्ड परिसरात कांदा व्यापारी नितीन दत्तात्रय चिपडे यांना जबर मारहाण करण्याचा प्रकार गुरुवारी दुपारी घडला होता. या मारहाणी नंतर गंभीर जखमी झालेले नितीन चिपाडे यांच्यावर आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. नितीन चिपडे यांच्या जबाबावरून कोतवाली पोलिसांनी महेंद्र उपाध्ये, मजरलाला तांबोळी, आणि दोन अनोळखी इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेची हकीकत अशी की नितीन चिपाडे आणि अशोक देसरडा हे एकमेकांचे मित्र आहे अशोक देसरडा यांनी नितीन चिपाडे यांच्या नावावर एका राष्ट्रीयकृत बँकेतुन पंचावन लाख कर्ज उचलले होते या कर्जाच्या हप्ते अशोक देसार्डे यांनी भरावयाचे ठरले होते. मात्र ठरल्याप्रमाणे हप्ते भरत नसल्याने नितीन चिपाडे हे गुरुवारी अशोक देसर्डा यांच्या दुकानात जाऊन याबाबत विचारणा करण्यासाठी गेले असताना त्या ठिकाणी असलेले महेंद्र उपाध्यै, मजरलाला तांबोळी अजुन दोन अनोळखी इसम यांनी नितीन चिपाडे यांना तिथून जाण्यासाठी सांगितले.मात्र मी आज अशोक देसर्डा यांना भेटल्याशिवाय जाणार नाही असा पवित्रा नितीन चिपाडे यांनी घेतल्यानंतर त्या ठिकाणी असलेले महेंद्र उपाध्ये, मजरलाल तांबोळी आणि त्यांच्यासोबत असलेल्या दोन्ही इसमाने नितीनच्या चीपाडे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली लाथा बुक्क्या तसेच हातातील दांडक्यांनी जबर मारहाण झाल्याने नितीन चिपाडे हे जागेवरच बेशुद्ध झाले होते त्यानंतर त्यांना आनंद ऋषी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

या प्रकरणातील सर्व गुंडांना लवकरात लवकर अटक करावी या मागणीसाठी आज कांदा व्यापारी तसेच नगर शहरातील शिंदे गट शिवसेना आणि ठाकरे गट शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जाऊन अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांची भेट घेतली आहे. तसेच शनिवारी समस्त हिंदू समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालयावर जाऊन जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version