Homeजिल्हाऑनलाईन कर्ज घेणारे आता पस्तावताहेत लोन फेडूनही मागीतली जातेय अव्वाच्या सव्वा रक्कम...

ऑनलाईन कर्ज घेणारे आता पस्तावताहेत लोन फेडूनही मागीतली जातेय अव्वाच्या सव्वा रक्कम नाही तर मित्र नातेवाईकांना फोन करून दिल्या जातात धमक्या

advertisement

अहमदनगर दि.१८ जून
एक मिनिटात ऑनलाईन ” फोन पे लोन ” या गोंडस शब्दाखाली अनेकांना फसवून ऑनलाईन अॅपवरून
घेतलेल्या पाच-दहा हजार रुपये कर्जाच्या बदल्यात कर्जदाराकडून तिप्पट, चौपट रुपये घेतले जात आहे.
त्यानंतरही धमक्या शिवीगाळ केली जात असल्याने ऑनलाईन कर्जदार वैतागून गेले आहेत. मोबाईल लोन अॅपवरून झटपट कर्ज देणाऱ्यांकडून नागरिकांवर दादागिरी केली जात असल्याचे वृत्त याआधी ही आवाज महाराष्ट्राचा या वेब पोर्टेल द्वारे दिले गेले होते . त्यानंतर अनेक नागरिकांना याच स्वरूपाचे अनुभव येत आहेत.

लोन घेणाऱ्याच्या रोजच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मधील नंबर वर कधी वकील बोलतोय तुमच्या मित्राने अमुक अमुक फायनान्सचे ऑनलाईन लोन आहे त्याने हप्ते वेळेवर भरले नाहीत तुम्हला मुंबई पुणे दिल्ली असे कोणत्याही शहराचे नाव सांगून कोर्टात यावे लागेल अशी सूचना दिली जाते, नंतर एक महिला फोन करून थेट शिवीगाळ करून धमकी देते,आणि हे फोन दिवसभर सतत वाजत राहतात त्यामुळे लोन घेणार आणि त्याच्या संपर्कात असलेले मित्र वैतागून जातात

सावेडी भागातील हातावर पोट असणाऱ्या एका व्यक्तीने मोबाईल लोन ॲपद्वारे 33 हजार रुपये घेतले. त्याबदल्यात त्याने मुद्दल आणि व्यजेचा भरणही केला मात्र तरीही त्याला आणखी पैशांसाठी तगादा लावून धमक्या दिल्या जात आहेत. आता संबंधित व्यक्तीच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील व्यक्तींना फोन करून त्यांची बदनामी केली जात आहे. हा प्रकार अनेकांबाबत घडत आहे. कमी व्याज, तत्काळ कर्ज देण्याचे आमिष दाखवून असे प्रकार केले जात आहेत.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular