HomeUncategorizedशहराच्या सौंदर्यात भर पडेल म्हणून उड्डाणपूलाच्या खाली असलेल्या पीलरवर छत्रपती शिवाजी महाराजांचा...

शहराच्या सौंदर्यात भर पडेल म्हणून उड्डाणपूलाच्या खाली असलेल्या पीलरवर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास रंगवाला जातोय मात्र पीलरवर खाजगी जाहिरातींचे बोर्ड लागल्यामुळे शिवप्रेमींकडून संताप व्यक्त

advertisement

.अहमदनगर दि.१४ ऑक्टोबर

अहमदनगर शहरातील पूर्णत्वास आलेल्या उड्डाणपूलाच्या खाली असलेल्या पिलरवर शहराच्या सौंदर्यतरणात भर पडेल म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित काही घटनांचे चित्र रेखाटण्याचे काम सध्या सुरू आहे. हे काम भारतीय जनता पार्टीचे खासदार सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या निधीतून होत आहे.उड्डाणपुलाच्या खाली असलेल्या अनेक पिलरवर सध्या या चित्रांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र रेखाटण्याची कल्पना खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांची होती की जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जिवंत राहील आणि या ठिकाणी पीलरवर कोणतेही विद्रुपीकरण होणार नाही. तसेच कोणतेही फ्लेक्स लावले जाणार नाही यासाठी ही संकल्पना लढवण्यात आली होती.

 

मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्राच्या खालीच सध्या एक जाहिरातीचा बोर्ड लागला असून त्यामुळे आता या विद्रुपीकरणास सुरुवात झाली आहे असं समजावे लागेल. कारण एक बोर्ड लागल्यानंतर हळूहळू सर्वच पीलरवर बोर्ड लागू शकतात. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास त्यामागे लपला जाऊ शकतो अशा अनधिकृत लावलेल्या जाहिराती फलकावर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी शिवप्रेमींकडून होत आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular