अहमदनगर दि.२४ सप्टेंबर –
मॅक केअर हॉस्पिटल ने ५ वर्षामध्ये टीम वर्कच्या माध्यमातून आरोग्य सेवेमध्ये रुग्णांचा विश्वास संपादित केला आहे कोविड संकट काळामध्ये मॅककेअर हॉस्पिटल ने कोविड रुग्णांना आधार देत योग्य पद्धतीने उपचार केले आहे. या आरोग्य सेवेमध्ये त्यांचा एक महत्त्वाचा वाटा आहे रुग्ण आता या हॉस्पिटल कडे कुटुंब म्हणून पाहत आहे. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये वेगवेगळे आजार येत आहेत त्याला आपल्या सर्वांना तोंड द्यावे लागत आहे. नगर जिल्हा हा भौगोलिक दृष्ट्या मोठा आहे या जिल्ह्यामध्ये आपण सर्वांनी कोविड संकट काळ हा टीम वर्कने पार पाडला आहे. मॅक केअर हॉस्पिटल (mac care hospital)ने सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासत ५ व्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे (blood-donation-camp) आयोजन करून आपले कर्तव्य पार पाडले असल्याचे प्रतिपादन आ. संग्राम जगताप (mla sangram jagtap)यांनी यावेळी केले.
मॅक केअर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे उद्घाटन आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी डॉ.सतीश सोनवणे,डॉ. मोहम्मद माजिद, डॉ. प्रशांत पठारे, डॉ. अभिजीत शिंदे, डॉ. सुदाम जरे, डॉ. पियुष पाटील, डॉ. निलेश परंजणे, डॉ. आनंद काशीद, शैलेश सदावर्ते, नगरसेवक अजिंक्य बोरकर, सामाजिक कार्यकर्ते संभाजी पवार,विशाल पवार, सुरेश बनसोडे, जावेद शेख, सुशील थोरात आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. सतीश सोनवणे म्हणाले की, मॅक केअर हॉस्पिटलचे डॉक्टर व कर्मचारी यांच्या सर्वांच्या टीम वर्क ने ५ वर्षामध्ये यशस्वी वाटचाल केली आहे. दोन वर्षाच्या कोविडच्या संकट काळामध्ये आम्ही रुग्णांना एक चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली आहे. हॉस्पिटलच्या माध्यमातून एक कुटुंबाचा वारसा जोपासत आहे रुग्णांना चांगली आरोग्य सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आ. संग्राम जगताप यांचे आरोग्य सेवेमध्ये एक महत्त्वाचे काम आहे. कोविड काळामध्ये त्यांनी केलेले कार्य आम्ही समक्ष पाहिलेले आहे. त्यांनी कोरोना रुग्णांचे मनोधैर्य व धिर वाढवला आहे या काळामध्ये येणाऱ्या अडचणींना धावून येत मदत केली आहे तेच खऱ्या अर्थाने कोविड योद्धा आहे असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रशांत पठारे यांनी केले तर स्वागत डॉ.मोहम्मद माजिद यांनी केले आणि कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. सुदाम जरे यांनी मानले.