पुणे दि.१५ जानेवारी
बारा वर्षांपासून महाराष्ट्रात गुटखाबंदी आहे मात्र तरीही संपूर्ण महाराष्ट्रात गुटखा विक्री सुरूच आहे. गुटखा महाराष्ट्रात हा महाराष्ट्राच्या शेजारील राज्यातून येतो हा गुटखा शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात विकला जातो. पोलीस अन्न व औषध प्रशासन कारवाही करतात मात्र गुटखा विक्रीला पूर्णपणे आळा बसू शकलेला नाही. केवळ कागदावरच गुटखा बंदी असून प्रत्यक्षात मात्र प्रत्येक टपरीवर गुटखा सर्रासपणे मिळतो व तोदेखील चढ्या दराने मिळतो.
त्यावर कठोर निर्बंध यावेत यासाठी राज्याचा अन्न व औषध प्रशासन विभाग सरसावला असून, गुटख्याचे स्मगलर, विक्रेते यंत्रणेला आढळून आल्यास त्यांना जन्मठेपेची शिक्षा देण्याचा प्रस्ताव राज्याच्या महाधिवक्त्यांनी केंद्रीय यंत्रणांना पाठविला. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास गुटखामाफियांना जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. महाराष्ट्रात गुटखाबंदी आहे; परंतु इतर राज्यांमध्ये ती नाही. त्यामुळे चोरट्या वाहतुकीद्वारे महाराष्ट्रा गुटखा येतो. आणि तो संपूर्ण महाराष्ट्रात वितरित होतो यावर आता कडक बंदी आणण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग सरसवला आहे