Home Uncategorized नऊ हजार गर्भपात गोळ्यांचा साठा पोलिसांनी केला हस्तगत नगर जिल्ह्यातील गर्भपाताचा “तो”...

नऊ हजार गर्भपात गोळ्यांचा साठा पोलिसांनी केला हस्तगत नगर जिल्ह्यातील गर्भपाताचा “तो” बादशाह फरार

अहमदनगर दि.११ मार्च
अहमदनगर शहरात गर्भपाता गोळ्यांचा मोठा साठा एमआयडीसी पोलिसांनी पकडला असून एका ट्रान्सपोर्ट ऑफिस मध्ये पोलिसांनी छापा टाकून सुमारे नऊ हजार गोळ्या जप्त केल्या आहेत.

या प्रकारानात अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त ज्ञानेश्वर मोहन दरंदले यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादी नुसार श्रीराम एजेन्सी चे मालक नितीन जगन्नाथ बोठे आणि आय व्ही ए हेल्थ केअरचो सर्व संचालक यांच्या विरोधात 420,468,471,34,34 व औषध व सौदर्य प्रसाधने कायदा 1940 अंतर्गत कलम 18(सी)18(ए)व 22 (सी सी ए)शिक्षा कलम 27(बी )व 28 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहा व्हिडीओ

प्राथमिक माहिती नुसार या गोळ्या हरियाणा मधील पंचकुला येथून आय व्हि ए हेल्थ केअर येथून नगर शहरात ट्रान्सपोर्ट ने आल्या होत्या नगर मधील श्रीराम एजेन्सी चे मालक नितीन जगन्नाथ बोठे यांच्या नावाने बिल आले असून बिलावर वेगळ्या गोळ्यांचे नाव असून बॉक्स मध्ये गर्भपाताच्या गोळ्या असल्याचं पोलीस आणि अन्न औषध प्रशासनाने तपासणीत आढळून आले आहे.

औषधाचा साठा आढळुन आला सदर बिला वरती वेगळ्या औषधाचे नाव असुन प्रत्यक्ष मात्र गर्भपाताचे औषध असल्याचं आढळून आले असल्याचं एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी अधिक माहिती देताना सांगितलंय तपास हरियाणा पर्यंत केला जाणार असून नगर शहरात अथवा जिल्ह्यात या गोळ्यांचा सप्लाय कोठे कोठे होत आहे याबाबतही तपास होणार असल्याची माहिती युवराज आठरे यांनी दिली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version