Homeजिल्हापंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येचा निषेध व्यक्त करत...

पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येचा निषेध व्यक्त करत काँग्रेसचे आंदोलन पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि अरविंद केजरीवाल यांच्या प्रतिमेचे दहन

advertisement

अहमदनगर दि १ जून
अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यात काँग्रेसने भगवंत मान आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल या दोघांचे फोटोला जोडे मारून प्रतिमेचे दहन करत मुसवाल यांच्या हत्येच्या घटनेचा निषेध केला आहे.


पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येला जेवढे मारेकरी जबाबदार आहेत तेवढेच पंजाब मधील सरकारही जबाबदार असल्याची टीका काँग्रेसने केली आहे.

 

रविवारी पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील जवाहरके गावाजवळ मूसेवालावर गोळीबार झाला होता. हल्लेखोरांनी त्यांच्या थार जीपवर 12 राऊंड गोळीबार केले होते. या घटनेत मुसेवाला यांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन साथीदार जखमी झाले आहेत.

भगवंत मान यांनी मुसेवाल यांची सुरक्षा काढून घेताच दुसऱ्याच दिवशी त्यांची हत्या करण्यात आल्याचे आंदोलनकर्त्याचे म्हणणे आहे, त्यामुळे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि अरविंद केजरीवाल यांच्या प्रतिमा दहन करून आंदोलन करण्यात आले.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular