Homeराजकारणपंकजा मुंडे यांच्या समोर पुन्हा नवीन अडचण आता सावरगाव येथेगडावर राजकीय भाषण...

पंकजा मुंडे यांच्या समोर पुन्हा नवीन अडचण आता सावरगाव येथेगडावर राजकीय भाषण नको जय भगवान महासंघाचा इशारा

advertisement

बीड दि.२८ सप्टेंबर
पाथर्डी तालुक्यातील भगवानगड(bhgavangad)दसरा मेळावा आणि स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे (gopinath munde ) यांचं आणि वंजारी समाजाचे एक वेगळेच नातं होतं याच भगवानगडावरून अनेक वेळा गोपीनाथ मुंडे यांनी वेगवेगळ्या घोषणा करून आपल्या राजकारणाला वेगळं वळण आणि समजला दिशा दाखवली होती. राजकारणा पलीकडे जाऊन मुंडे यांचे भगवानगडाशी एक वेगळं घट्ट नातं जमलं होतं.मात्र कालांतराने या ठिकाणी पंकजाताई मुंडे(pankja munde) यांनीही दसरा मेळाव्याच्या माध्यमातून समजला दिशा दाखवण्याचे काम केले.

मात्र त्या ठिकाणी राजकीय भाषणाला विरोध झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी बीडमधील पाटोदा तालुक्यात सावरगाव हे भगवान बाबांचं जन्मगाव. आता हा भगवान भक्तीगड म्हणून ओळखला जातो.त्या ठिकाणी मागील 7 वर्षांपासून पंकजा मुंडे ज्या भगवान भक्तीगडावर मेळावा घेतात.आता या सावरगाव येथील भगवान गडावरूनही संघर्ष होताना दिसतोय.जय भगवान महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी यावर्षी दसरा मेळावा कृती समितीची स्थापना केली आहे. भगवान गडावर राजकीय भाषण नको, ही भूमिका घेत त्यांनी आता सावरगाव येथील भगवान गडाच्या पायथ्याशी दुसरा मेळावा घेण्याचं जाहीर केलंय.

त्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेचे दोन मिळावे मुंबईमध्ये होत आहेत तर याच पार्श्वभूमीवर आता सावरगाव येथे दोन मिळावे होणार का ? की याबाबत काही तोडगा निघणारा याची उत्सुकता समस्त भगवान बाबा भक्तांमध्ये लागून राहिली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular