Homeक्राईमपाथर्डी तालुक्यातील देवराईत निवडणूक निकालानंतर दोन गटात वाद तलवारीचे वार...

पाथर्डी तालुक्यातील देवराईत निवडणूक निकालानंतर दोन गटात वाद तलवारीचे वार झाल्याने एक ठार तीन जखमी

advertisement

पाथर्डी दि.१८ जून

पाथर्डी तालुक्यातील देवराई येथे सेवा संस्थेच्या निवडणुकीचा निकाल शनिवारी सायंकाळी लागला यामध्ये सत्ताधारी गटाला अकरा जागा मिळाल्या तर विरोधी गटाला दोन जागा मिळाल्या निवडणूक निकालानंतर विजय गटाने गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा केला त्यानंतर दोन गटात वाद झाला यामध्ये चार जणांवर तलवारीने वार झाल्याने दोघांना उपचारासाठी नगरला खाजगी दवखण्यात  हलविण्यात आले त्यापैकी एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समजल्यानंतर गावातील वातावरण तणावपूर्ण बनले व ग्रामस्थांनी रस्त्यावर येऊन आंदोलन सुरू केले आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी पोलिसांकडे केली. सुमारे दोन तास या ठिकाणी ग्रामस्थांनी महामार्ग रोखुन धरला होता. यावेळी पाथर्डी शेवगावचे पोलीस अधिकारी व कर्मचारी देखील उपस्थित होते.

देवराईत निवडणुकीच्या कारणावरून झालेल्या हाणामारीत अजय गोरख पालवे, विष्णू कैलास पालवे, मनोहर नवनाथ पालवे, वैभव कैलास पालवे, सुमन नवनाथ पालवे यांना तलवारीने मारहाण झालेली आहे यामध्ये अजय गोरख पालवे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समजली आहे. त्यामुळे देवराई येथील वातावरण तणावपूर्ण बनले  पोलीस आरोपींच्या तपासासाठी रवाना झाले आहेत.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular