Homeजिल्हावाहन पसंतीच्या क्रमांकासाठी आता मारावी लागणार नाही आरटीओ मध्ये चक्कर घरी बसूनच...

वाहन पसंतीच्या क्रमांकासाठी आता मारावी लागणार नाही आरटीओ मध्ये चक्कर घरी बसूनच करू शकता आपला आवडता नंबर बुक..

advertisement

अहिल्यानगर दिनांक 5 डिसेंबर

गाडीचा नंबर जेवढा आकर्षक तेवढी पत मोठी असा अनेकांचा गैरसमज असतो. आपल्या गाडीपेक्षा तिचा नंबर दुसऱ्यांचे लक्ष कसे वेधून घेईल, याकडेही बऱ्याच जणांचा कल असतो. त्यासाठी अधिकचे पैसे मोजण्यास तयार होतात. अलीकडच्या काळात ही क्रेझ वाढत असून हौसेला मोल नाही याची प्रचिती यानिमित्ताने आल्याशिवाय राहत नाही. दरम्यान, आता अशा पसंतीच्या व्हीआयपी नंबरसाठी आरटीओत हेलपाटे मारावे लागणार नाहीत. त्यासाठी ऑनलाइन प्रणाली विकसित केली आहे. त्यामुळे वाहनधारकांची होणारी धावपळ वाचणार आहे.

नवीन वाहन खरेदी केल्यानंतर वाहनधारक परिवहन कार्यालयात येऊन पसंती क्रमांक शुल्क भरणा करून त्यांच्या वाहनांकरिता पसंती क्रमांक घेत असतात. २६ नोव्हेंबर २०२४ पासून शासनाने fancy.parivahan.gov.in या संकेतस्थळावर पसंती क्रमांक शुल्क ऑनलाईन भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच वैयक्तिक मालकीच्या वाहनाव्यतिरिक्त इतर सर्व प्रकारच्या वाहन मालकास आकर्षक नोंदणी क्रमांक परिवहन कार्यालयामार्फत जारी करण्यात येणार असल्याचेही कळविण्यात आले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular