Home Uncategorized आगामी सण,उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ड्रम, बाटली मध्ये सुट्टे पेट्रोल विकण्यावर प्रतिबंध तोफखाना पोलीस...

आगामी सण,उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ड्रम, बाटली मध्ये सुट्टे पेट्रोल विकण्यावर प्रतिबंध तोफखाना पोलीस ठाण्यात पेट्रोल पंप चालकांची बैठक

अहमदनगर दि.२४ एप्रिल
पुढील काळात येणाऱ्या सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पेट्रोल पंपावर सुट्टे पेट्रोल अर्थात बाटली आणि ड्रम मधून पेट्रोल विकण्यात बंदी घालण्यात आली असून त्या बाबतची एक बैठक तोफखाना पोलीस ठाण्यात घेण्यात आली.

पुढील महिन्यात पवित्र रमजान ईद साजरी होत असून त्यानंतर काही उत्सव साजरे होणार आहेत त्यामुळे या काळात काही समाजकंटकांकडून अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासन खबरदारी घेत आहे. त्याच पार्श्वभूमीवर तोफखाना पोलीस स्टेशन हद्दी मधील पेट्रोल पंप चालकांची बैठक तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये घेण्यात आली.


तोफखाना पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी पेट्रोल पंप चालकांना काही सूचना केल्या आहेत पेट्रोल विक्री करताना फक्त वाहनांच्या टाकीत पेट्रोल भरून देण्यात यावे बाटली आणि ड्रममध्ये सुट्टे पेट्रोल विक्री करू नये आणि नागरिकांनी सुद्धा या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन ही ज्योती गडकरी यांनी केले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version