अहमदनगर दि.९ ऑक्टोबर :
संरक्षण खात्याचे बनावट ना हरकत प्रमाणपत्र (NOC) तयार केल्याप्रकरणी अटक केलेल्या आरोपींचे कॉल डिटेल्ससह बैंक खात्याचीही चौकशी केली जाणार असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी दिली.
हे प्रकरण संरक्षण व महसूल खात्याशी संबंधित असल्याने हा तपास उपअधीक्षक अनिल कातकडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे सुरुवातीपासून सदर प्रकरणाचा तपास झेंडीगेट पोलीस चौकीचे उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे हे करत होते. त्यांच्याकडून हा तपास काढून घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. यामुळे या प्रकरणाचा सुरुवातीपासून पाठपुरावा करणारे सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी थेट संरक्षण मंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री आणि पोलीस महासंचालक यांच्याकडे लिखित तक्रार केली आहे.
त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी याबाबत तपासामध्ये पुन्हा फेरबदल करून सुरुवातीचे चौकशी करणारे पथक म्हणजेच झेंडीगेट पोलीस चौकीचे उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे यांच्यासह अभय कदम,सलीम शेख, सुमीत गवळी, बंडू भागवत, रवींद्र टकले, अतुल काजळे, दीपक बोरूडे, यांना तपास कामासाठी पुन्हा सहभागी करून घेतली असल्याची माहिती रात्री उशिरा मिळाली आहे.
महसूल विभागाच्या उपविभागीय कार्यालयाने दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी राजेंद्रसिंग देशराजसिंग ऊर्फ राजासिंग ठाकूर व रोहित धेंडवाल या दोघांना अटक केली आहे.आतापर्यंतच्या चौकशीत या प्रकरणात दोघांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. तर काही संशयित एजंटांची चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आले होते. मात्र यापैकी एक एजंट पोलिसांच्या रडारवर असून लवकरच त्याच्यावर कृपा होऊ शकते कारण या एजंटचा प्रांत कार्यालयाच्या परिसरात राबता होता. त्याची कॉल डिटेल्स समोर आल्यानंतर तो कोणाच्या किती संपर्कात आणि का होता याचे रहस्य उलगडणार आहे. तसेच बँक खात्याची चौकशी केली तर मोठा आर्थिक घोटाळा समोर येऊ शकतो.
एनओसीचा हद्दीलगत वापर करून लष्कर बांधकाम परवाने मिळविण्यात आलेले आहेत. अशा पद्धतीने या परिसरात किती आराखडे मंजूर केले गेले, याची स्वतंत्र चौकशी केली जाणार आहे. या एनओसीचा वापर करून किती बांधकामांना परवानगी दिली. ही परवनगी देताना काय निकष होते, त्याचे पालन झाले आहे का, हेही तपासले जाईल. त्यासाठी काळात प्रांत या कार्यालयातून वितरित झालेल्या परवान्यांची माहिती बांधकाम पोलिसांनी मागविलेली आहे.
पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे यांच्याकडे तपास आल्या नंतर कातकडे यांनी आरोपींची कसून चौकशी करून बनावट noc साठी वापरले जाणारे प्रिंटर, कागदी रील, आणि शिक्के हस्तगत केल्याची माहिती हाती येत आहे.