अहमदनगर दि.२९ ऑगस्ट
गणपती गणेशोत्सव जवळ आला असून ३१ ऑगस्ट रोजी गणपती आगमन होणार आहे. सर्वच सार्वजनिक गणेश मंडळ तसेच घरगुती गणपती उत्सवासाठी सर्वजण तयारीत आहेत मात्र अनेक वेळा हा प्रश्न उपस्थित झाला आहे की प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती मुुुळे पर्यावरणाला धोका होऊ शकते. त्या मुर्त्या लवकर पाण्यात विरघळत नाहीत त्यामुळे आता यावर उपाय आला असून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पाण्यात विरघळू शकते.
अहमदनगर उपनगर मधील गुलमोहर रोडवरील पारिजातक चौक परिसरातील कलाश्री आर्टस् च्या वतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सव आणि पर्यावरण अनुकुल गणेश विसर्जन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कलाश्री आर्टस् व मंगलारप सुधीर मित्र मंडळाच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले असून पीओपी च्या मुर्तीचे विघटन आपण करू शकतो त्या साठी काही गोष्टी समजून घेणे गरजेचे असून शाडू माती प्रमाणे पिओपी च्या मूर्ती सुद्धा पाण्यात विरघळू शकता आणि पर्यावरण पूरक गणपती विसर्जन करू शकतो.
POP च्या गणेश मुर्तीचे विसर्जन घरातल्या घरात कसे करावे.
नागरिकांनी गणेश मुर्तीची उंची २ फुटा पेक्षा कमी ठेवावी किंवा मृण्मयी गणेश किंवा शास्त्रोक्त पध्दतीने
श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा करावी.
मुर्ती POP ची असल्यास गणपती विसर्जन करण्यासाठी पुरक असे अमोनियम बायकार्बोनेट (ABC) ही पावडर उपयुक्त ठरू शकते
कशी कराल pop मूर्ती घरच्या घरी विसर्जन
बादलीत पाणी घेऊन त्यात अमोनियम बाय कार्बोनेट घालून (ABC) पुर्ण विरघळवा. शक्यतो प्लास्टिक पेंटच्या मुर्ती आणू नयेत.
निर्माल्य व सजावटीच्या वस्तू बाजूला काढुन फक्त मुर्ती (ABC) च्या मिश्रणात विसर्जन करावी.
दर दोन-तीन तासांनी मिश्रण काठीने ढवळावे.
४८ तासांत मुर्ती पाण्यात विरघळते. प्लास्टिक पेंटच्या मुर्ती असल्यास थोड्या वेळाने हाताने मुर्तीवरील प्लास्टिक पेंटचा थर बाजूला करावा. अशामुळे मुर्ती लवकर विरघळण्यास मदत होईल. बादलीच्या तळाशी कॅलशियम कार्बोनेटचा थर जमा होतो. हे तयार झालेले द्रावण दोन दिवस बाजूला ठेवावे म्हणजे कॅलशियम कार्बोनेटचा धर पाण्यापासून वेगळा होईल.
मुर्ती विरघळून तयार झालेले पांढुरके पाणी म्हणजेच अमोनियम सल्फेट. ह्या द्रावणात ५ पट माती मिसळून ते झाडांना आणि कुंड्याना खत म्हणुन घालता येऊ शकते.
मूर्तीचा काही भाग द्रावणात पूर्ण विरघळला नाही तर पुन्हा एक नवीन बादली घऊन त्यात ५ लिटर पाणी आणि १ कि.ग्र. एबीसी घालून नवीन द्रावण तयार करा आणि त्यात न विरघळलेला भाग पुन्हा घाला. आणि दर २-३ तासांनी मिश्रण काठीने ढवळा. आता या द्रावणात उरलेला भाग काही वेळाने पूर्ण विरघळेल.
यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्तीची उंची 6 इंच ते 18 इंचापर्यंत असल्यास त्याप्रमाणे बादलीचे आकारमान वेगवेगळे ठेवावे जेणेकरून संपूर्ण मूर्ती पाण्याखाली बसू शकेल तसेच पाण्याचे प्रमाणही वेगवेगळ्या बादली नुसार असू शकते. आणि अमोनियम बायकार्बोनेट चे प्रमाणही सहा इंचाच्या मूर्तीसाठी एक किलो सात ते दहा इंच मूर्तीसाठी दोन किलो 11 ते 14 इंच मूर्तीसाठी चार किलो आणि पंधरा ते अठरा इंच मूर्तीसाठी सहा किलो असे वापरण्यात यावे की जेणेकरून मूर्ती संपूर्णपणे पाण्यात विरघळू शकेल.
मुर्तीचे विसर्जन घरच्या घरी करावे अथवा मुर्तिदान करुन पुनर्वापरासाठी प्रोत्साहन द्यावे. मुर्ती POP ची असल्यास त्यासाठी पुरक असे अमोनियम बायकार्बोनेट (ABC) ही पावडर आपणास कलाश्री आर्टस् पारिजात चौक, गुलमोहर रोड, येथे उपलब्ध आहेअधिक माहिती साठी संपर्क – ९८९०६१७८४८ / ९७६२५७१५१५ या नंबरवर संपर्क करावा असे आवाहन कलाश्री आर्टस् चे संचालक राजू मंगलारप यांनी केले आहे.