पुणे दि.२१ जुलै
: पुणे महानगरपालिका सामान्य प्रशासन विभागांतर्गत सहाय्यक वधिकारी, लिपिक टंकलेखक, कनिष्ठ अभियंता आणि सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक यासारख्या विविध वर्ग 2 आणि वर्ग 3 च्या पदांच्या 448 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी ऑनलाइन अर्जाची लिंक अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच pmc.gov.in उपलब्ध आहे. पीएमसी ऑनलाइन अर्ज 20 जुलै 2022 पासून उपलब्ध असेल. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अंतिम दिनांक 10 ऑगस्ट 2022 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. एकूण रिक्त पदांपैकी लिपिक टंकलेखक 200, कनिष्ठ अभियंता (जेई) साठी 144, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक 100 आणि सहाय्यक विधी अधिकारी पदांसाठी 4 रिक्त जागा आहेत.
भरतीसाठीची वयोमर्यादा
पुणे महानगरपालिकेनं जारी केलेल्या भरतीसाठी अर्ज
करण्यासाठी उमेदवारांचं कमीत कमी वय 18 वर्ष
आणि जास्तीत जास्त वय 38 वर्ष असावं
पीएमसी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात – 20 जुलै
2022
पीएमसी ऑनलाइन नोंदणी शेवट – 10 ऑगस्ट
2022
अर्ज छपाईची शेवटची तारीख – 25 ऑगस्ट
2022
ऑनलाइन फी भरणा- 20 जुलै 2022 ते 10
ऑगस्ट 2022