HomeUncategorizedकोतवाली पोलीसांची सिनेस्टाईल धड़ाकेबाज कारवाई- परराज्यातील टोळीसह स्थानिक विक्रेतास केले जेरबंद-19,00,000/- किमतिच्या...

कोतवाली पोलीसांची सिनेस्टाईल धड़ाकेबाज कारवाई- परराज्यातील टोळीसह स्थानिक विक्रेतास केले जेरबंद-19,00,000/- किमतिच्या गांजासह तीन वाहने व मोबाईल सह 8,00,000/-किमतीचा मुद्देमाल जप्त 10 आरोपी कोतवाली पोलिसांच्या ताब्यात..

advertisement

अहिल्यानगर दिनांक 20 जून

गुरुवारी   रात्री कोतवाली पोलीसांनी मोठी मालट्रक पकडून त्यामधून उडीसा राज्यातून नगर मध्ये विक्रीसाठी आणलेला गांजा पोलिसांनी पकडला आहे. कोतवाली पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार. नगर शहराच्या बाहेरून जाणाऱ्या बायपास परिसरात गंगा नावाचा एक माणूस उडीसा येथून मोठ्या प्रमाणात गांजा घेऊन येणार होता. तो गांजा नगर शहरातील काही विक्रेत्यांना विकणार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. त्यानुसार कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी आपल्या पथकासह  नगर शहराच्या बाहेरून जाणाऱ्या बायपास रोडवरील टोल नाका येथे दबा धरून बसले होते.

रात्री पावणे अकराच्या सुमारास एम.ए. 16. सी. जी.0452 ही मालट्रक संशयास्पदरित्या आढळून आली .पोलिसांनी ही गाडी थांबवून त्या गाडीची झडती घेतली असता गाडीच्या केबिनमध्ये चार गोण्या खाकी रंगाच्या चिकट टेप मध्ये गुंडाळलेल्या आढळून आल्या. या गोण्या नगर मधील विक्रेत्यांना देण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना समजतात त्यांनी ट्रक चालकाला त्या इसमांना बोलून घेण्यास सांगितले.

   

 त्यावेळी कोतवाली पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि अधिकारी त्या परिसराच्या आनुबाजूला दबा धरून बसले. पोलिसांनी गांजाचा माल घ्यायला येणाऱ्या लोकांना पकडण्यासाठी सापळा रचला. काही वेळातच त्या ठिकाणी एक लाल रंगाची स्वीफ्ट गाड़ी आणि एक होंडा सिटी गाडी दाखल झाली. पोलिसांना खात्री होताच  त्या ठिकाणी दाबा धरून बसलेल्या पोलिसांनी दोन्हीही गाडीतील इसमांना ताब्यात घेतले.त्यावेळी काहीजण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.

कोतवाली पोलीसांनी गांजा वितरीत करण्याकरिता आलेल्या मालट्रक मधील तीन जणांसह विकत घेण्यासाठी आलेल्या सात जणांना पकडले असून. या सर्व दहा जणांविरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुंगीकारक औषधीद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8 (क), 20 (4) (2) (क), 29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 संतोष प्रकाश दाणावे, गणेश बापू भोसले,  प्रशांत सुरेश मिरपगार,  प्रदिप बापू डहाणे, भगवान संजय डहाणे, संदिप केशव बाग दिलीप माखनो प्रमोद सुहास क्षेत्रे,  ईश्वर संतोष गायकवाड,  अशी आरोपींची नावे असून त्यांच्या ताब्यातून 19,90,000/- रु किमतीचा अंमली पदार्थ गांजासह, तीन वाहने,  11 मोबाईल असा एकून 88,00,000/-रु किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक  प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी अहिल्यानगर शहर विभाग अमोल भारती, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, स.पो.नि. कुणाल सपकाळे, पो.उप.निरी. शितल मुगडे, स.फो. बोडखे, म.पो.हे.कॉ. रोहिणी दरंदले, पो.हे. करें. राजेंद्र ओटी, सचिन मिरपगार, गणेश चक्षाण, रहुल शिंदे, संदिप पितळे, पोकॉ. दिपक रोहोकले, तानाजी पवार, दक्षिण विभाग मोबाईल सेलचे पो.कॉ. राहुल गुंडु, कोतवाली पोलीस स्टेशनचे पो.कॉ. सुरज कदम, सचिन लोळगे, शिरीष तरटे, अतुल कोतकर, राम हंडाळ, संकेत धिवर, सोमनाथ राऊत, बाळासाहेब ढाकणे, अर्जुन फुंदे, म.पो.कॉ. प्रतिभा नागरे यांनी केली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular

09:05